Tarun Bharat

भीमा कोरेगाव प्रकरणी शरद पवारांचा नोंदवला जाणार जबाब


मुंबई \ ऑनलाईन टीम


भीमा-कोरेगाव प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज २ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या प्रकरणी शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकाराने नियुक्त केलेल्या चौकशी आयोगाद्वारे भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा जबाब नोंदवण्यात येईल. २ ऑगस्टपासून साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येतील व पवार यांनाही समन्स बजावले जाईल, असे चौकशी आयोगाचे वकील आशिष सातपुते म्हणाले. एएनआयने या संदर्भात वृत्त दिले आहे.


शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. त्यानंतर पवारांचा जबाब नोंदवण्याची मागणी आयोगाकडे करण्यात आली होती.

Related Stories

ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्यास परवानगी , मुदतही वाढली

Archana Banage

समाजहितासाठी प्रथम शासनाचा आदेश पाळा; करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती स्वामीजींचे आवाहन

Archana Banage

कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर गॅस टँकर उलटला; तीन किलोमीटर परिसरात बंदी

datta jadhav

स्वाभिमानी शेतकरी संघटना दरोडेखोर आणि खंडणीखोरांची-सदाभाऊ खोत

Abhijeet Khandekar

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा 11 वा बळी, 7 नवे रुग्ण

Archana Banage

दौलताबाद किल्ल्याचे नाव देवगिरी करणार, पर्यटन मंत्री लोढांची घोषणा

Archana Banage