Tarun Bharat

‘भीम बेटका’ संकल्पनेवर आधारित कला प्रदर्शन 26 जानेवारीपासून

Advertisements

ऑनलाईन टीम  / पुणे  : 

महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या स्कुल ऑफ आर्ट तर्फे पाषाणकालीन ‘भीम बेटका गुहा ‘ संकल्पनेवर आधारित चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. भीम बेटका ही मध्य प्रदेशातील पाषाण युग कालीन गुहा असून 30 हजार वर्षापूर्वीची चित्रे तिथे आढळली आहेत.
स्कूल ऑफ आर्ट च्या विद्यार्थ्यांचे चित्र प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन स्कुल ऑफ आर्ट, आझम कॅम्पस येथे २६, २७ जानेवारी रोजी होणार आहे. शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते आणि संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
२६ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन होईल. चित्रकार अजय धर्माधिकारी यांचे कला प्रात्यक्षिक यावेळी होईल. २६, २७ जानेवारी रोजी प्रदर्शनाची वेळ ११ ते ५ अशी राहील. 

Related Stories

सोलापूरकरांना दिलासा, कोरोना बाधित 9 रुग्ण बरे झाल्याने सोडले घरी

Archana Banage

शेततळ्यातील पाणी तात्काळ कमी करा : रवींद्र माने

Archana Banage

महंमद पैगंबर यांची बदनामी करणाऱ्या फ्रान्सला बायकॉट करा

Archana Banage

पंढरपुरातील लॉकडाऊन एक दिवसाने वाढवला

Archana Banage

साडेचार हजार किलोमीटरवरून आलेल्या ‘भोवत्या’ पक्ष्यांना सोलापुरात लावले जीएसएम सोलारटॅग

Archana Banage

सांगोला येथून शंभराव्या किसान रेल्वेला पंतप्रधानांकडून हिरवा झेंडा

Archana Banage
error: Content is protected !!