Tarun Bharat

भुईपाल येथे 29लाखाचे बनावट मद्य जप्त

प्रतिनिधी/ पणजी

 गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी भेडशीवाडा भुईपाल सत्तरी येथे केलेल्या कारवाईत सुमारे 29 लाख 49 हजार 600 रुपये किमंतीचे बनावट मद्य जप्त करण्यात आले आहे. हे बनावट मद्य शेजारील राज्यात जाणार होते, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. एमएच-14- व्ही- 5919 क्रमांकाचा ट्रकही जप्त करण्यात आला असून त्यावरुन या बनावटगीरीचे ‘पुणे कनेक्शन’ उघड झाले आहे.

गोव्यातून बेकायदेशीररित्या मद्याची बॉक्स भरलेला ट्रक जात असल्याची माहिती रविवारी संध्याकाळी सीआयडी पोलिसांना मिळाली होती. ज्या रस्त्यांतून ट्रक जाणार होता त्या रस्त्यावर पोलीस दबा धरून बसले होते. परंतु वाहन ट्रक चालकाला ही माहिती मिळताच त्यांने रस्ता बदलून दुसऱया रस्त्याने जाण्याचा प्रय़त्न केला होता.

ट्रकचालकाने ट्रक सोडून केला पोबारा

सीआडी पोलिसांना ही माहिती मिळताच त्यांनी ट्रकचालकाचा पाठलाग करायला सुरुवात केली होती. ट्रकचालकाने अखेर भेडशीवाडा भुईपाल एसीजएल पॅक्टरीच्या समोर ट्रक सोडून पोबारा केला होता. पोलिसांनी रविवारी रात्रभर ट्रकची शोधाशोध केली होती. काल सोमवारी बेवारस स्थितीत ट्रक असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

ट्रकमध्ये सापडले लाखोंचे बनावट मद्य

दोन पंचाच्या साक्षीने ट्रकचे केबिन  उघडले. चालकाच्या सीटजवळ चावी सापडली. तिच्या सहाय्याने ट्रकच्या मागील भाग उघडला असता त्यात लाखो रुयांचे मद्य असल्याचे आढळून आले. पोलिसांनी मद्याची तपासणी केली असता ट्रकमध्ये असलेले मद्य बनावट असल्याचे आढळून आले.

हे बनावट मद्य नेमके कुठे तयार होते?

अबकारी खात्याचे आयुक्त शषांक त्रिपाठी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. अधीक्षक मिलाग्रीज यांना जप्त केलेल्या मद्याची सखोल तपासणी करण्याचा आदेश जारी केला आहे. ज्या प्रकारचे मद्य जप्त करण्यात आले आहे त्या प्रकारचे मद्य गोव्यात तयार होत नाही. त्यामुळे हे बनावट मद्य गोव्यात आले होते की गोव्यात बनावट मद्य तयार करून इतर राज्यात पाठविले जात आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ट्रकची तपासणी केली असता सदर ट्रक पुणे येथील आशा मुकुंद देसाई यांचा असल्याचे आढळून आले आहे. सीआयडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. सीआयडीचे अधीक्षक शोबीत सक्सेना, उपअधीक्षक सुनिता सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तगुरु सावंत, कॉन्स्टेबल दिनेश पिकुळकर व वाहन चालक किरण परब यांनी ही कारवाई केली.

Related Stories

…तर शाळा आम्ही चालवतो!

Amit Kulkarni

आपतर्फे आणखी पाच उमेदवार जाहीर

Amit Kulkarni

सावधान; पणजीत येताय रस्ता बंद!

Patil_p

कोंब रेल्वे क्रॉसिंगच्या समस्येवर कायमस्वरूपी उपायाकडे दुर्लक्ष

Amit Kulkarni

आय-लीग स्पर्धेत चर्चिल-रियल काश्मीर बरोबरीत; मोहम्मेडन विजयी

Amit Kulkarni

ग्राम पंचायत निवडणुका लांबणीवर

Amit Kulkarni