मुंबई \ ऑनलाईन टीम
ओबीसींच्या इम्पेरिकल डेटा केंद्राने पुरवावा यासाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावरुन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी छगन भुजबळ यांनी टीका केली आहे.
नारायण राणेंची जन आशिर्वाद यात्रा आज कोकणात आहे. या यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलखतीमध्ये छगन भुजबळ यांच्यावर ओबीसींच्या इम्पेरिकल डेटाच्या मुद्दयावरून टीका केली. नारायण राणे म्हणाले की, आरक्षणचा मुद्दा क्लियर झालेला आहे. मराठा आणि ओबीसीचा मुद्दा क्लियर केले आहे. छगन भुजबळ एकदा जेलमधून आल्यानंतर संपल्यात जमा आहेत. उद्धव ठाकरेंनी त्यांना दिल्लीत पाठवू नये. तुम्ही सत्तेत होता 15 वर्ष काय केले? आता आम्ही काही तरी करत आहोत. आता राज्यात विरोधी पक्षात बसा, आता बस झालं तुमचं, असं नारायण राणे म्हणाले.
महापुरानंतर केंद्रीय कृषीमंत्र्यांनी महाराष्ट्राला 700 कोटी रुपये पाठवले, आता राज्य सरकारने ते पैसे तातडीने वाटावे, अन्यथा मी परत पंतप्रधानांना सांगेन की आपली मदत वाटली गेली नाही, लोकांना मदत मिळत नाही. आता तुम्ही मातोश्रीला घरी बसलेले आहेत, कायम घरीच बसा, असा हल्लाबोल राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला.


previous post