Tarun Bharat

भुदरगड मध्ये मराठा समाजामार्फत पाटगाव ते आदमापूर संघर्ष यात्रा


खासदार संभाजीराजे यांच्या उपस्थितीत होणार संघर्ष यात्रा


पाटगांव / वार्ताहर

मराठा आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचा पुन्हा एल्गार भुदरगड तालुका सकल मराठा समाजामार्फत शनिवार दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी सकाळी ९ वां. पाटगाव ते आदमापूर मराठा संघर्ष यात्रा चे नियोजन करण्यात आले आहे यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते संघर्ष यात्रेचा शुभारंभ होणार आहे

राज्यात आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाने ऐतिहासिक एकजूट दाखविली, संपूर्ण राज्यात 58 मूक मोर्चे काढण्यात आले होते पुढे आंदोलनाचे स्वरूपही बदलले; मोठ्या संघर्षानंतर आरक्षण पदरात पडले आहे. त्यासाठीदेखील अनेक तरुण बांधवांनी बलिदान दिले.  पण सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती त्यामुळे मराठ्यांच्या मध्ये तीव्र असंतोष पसरला आहे कोणत्याही परिस्थितीत मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी संपूर्ण राज्यभर आंदोलने केली जात आहेत . त्याच अनुषंगाने मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी भुदरगड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गारगोटी येथे चक्काजाम आंदोलन ,सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला विरोध अशी वेगवेगळे आंदोलने करून कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजाच्या समाजाच लक्ष वेधून घेतले आहे .

आता पुन्हा एकदा पाटगाव पासून तांबाळे, कडगाव ,शेणगाव , गारगोटी ,मडिलगे ,कुर ,मुदाळतिट्टा आदमापुर पर्यंत मराठा संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे या यात्रेत साठी भुदरगड तालुक्यातील सर्व मराठा समाजाने सहभागी व्हावे अस अवहान तालुकाध्यक्ष नंदकुमार शिंदे ,मच्छिंद्र मुगडे व सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे

Related Stories

गोकुळ शिरगावात चार घरे जळून खाक

Archana Banage

चुये येथे शॉर्ट सर्किटमुळे घर जळून खाक; चार लाखाचे नुकसान

Archana Banage

शिवाजी विद्यापीठाच्या नॅक मूल्यांकनास प्रारंभ

Archana Banage

महाराष्ट्रात मागील 24 तासात 311 पोलिसांना कोरोनाची लागण

Tousif Mujawar

शाहूपुरीचा पाणी पुरवठा आजपासून सुरळीत होणार

Patil_p

माळी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी प्रा. संभाजीराव गोरे यांची निवड

Archana Banage