Tarun Bharat

भुयेवाडीत पाच दिवस लॉकडाऊन ; कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने खळबळ


वार्ताहर / शिये

भुयेवाडी (ता. करवीर) येथे मुंबईहुन आलेल्या तरुणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने भुयेवाडी गाव पाच दिवस लॉकडाऊन करण्यात आले आहे.

पॉझिटिव्ह आलेला तरुण मुंबई येथे नेव्हीत होता. तो शुक्रवारी, दि. 3 जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास भुयेवाडी येथे घरी आला. ही माहिती ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना समल्यानंतर त्यांनी तात्काळ त्याला सीपीआरला पाठवून त्याचा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल रविवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याच्या घरातील चौघांनाही रात्री उशिरा सीपीआर हॉस्पिटल नेले असून त्यांचे स्वॅब घेतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून भुयेवाडी ग्रामपंचायतीने संपूर्ण गाव लॉकडाऊन केले आहे. तसेच संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आला आले.

Related Stories

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणूक निकाल

Archana Banage

चेकपोस्ट छावणीत भरधाव ट्रक घुसला

Patil_p

महाराष्ट्रात 3,513 कोरोनाबाधित बरे

Tousif Mujawar

पाणीपट्टीचे आंदोलन कृष्णा नदीपात्रात

Patil_p

कोल्हापूर : पाचगावामध्ये कोरोनाबाधितांची संख्या २१७ वर

Archana Banage

छत्रपती शिवरायांचा पुतळा विटंबना प्रकरणी मनसेकडून निषेध

Abhijeet Khandekar