Tarun Bharat

भूकंपाच्या धक्क्यांनी नेपाळ परिसर हादरला

काठमांडू

 नेपाळमध्ये रविवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. राजधानी काठमांडूपासून 166 किमी अंतरावर भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त रविवारी सायंकाळपर्यंत हाती आले नव्हते. तसेच कोणत्याही ठिकाणी पडझड किंवा घरे कोसळण्याची घटनाही घडली नाही. भारताच्या पूर्व आणि उत्तर भागातही काही ठिकाणी भूकंपाची तीव्रता जाणवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. तथापि, पहाटेच्या सुमारास हा भूकंप झाल्यामुळे त्याची जाणीव बऱयाचशा लोकांना होऊ शकली नाही.

Related Stories

तेलंगणात 4 दिवसांमध्ये दुसऱयांदा अतिवृष्टी

Patil_p

सीमेवर सेनामाघार बव्हंशी पूर्ण : चीन

Patil_p

पत्रकारांच्या अभिव्यक्तीबद्दल त्यांना तुरुंगात टाकणे चुकीचे : संयुक्त राष्ट्र

Abhijeet Khandekar

जपानमध्ये कोरोनाची लाट परतणार, प्रशासन झालं सतर्क

Patil_p

रशियन दुतावासाबाहेर काबूलमध्ये स्फोट

Patil_p

मालदीवमध्ये आगीत नऊ भारतीयांचा मृत्यू

Amit Kulkarni