Tarun Bharat

भूपेंद्र पटेल गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सोमवारी घेणार शपथ

गांधीनगर/प्रतिनिधी

गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी शनिवारी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. दरम्यान, आज नवीन मुख्यमंत्री निवडीसंदर्भात पक्षाची बैठक झाली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावावर गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्ह्णून शिक्कामोर्तब झाले आहे.

भूपेंद्र पटेल गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील, अशी माहिती सत्ताधारी भाजपच्यावतीने केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी दिली. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या आमदारांची आज (रविवार १२ सप्टेंबर २०२१) बैठक झाली. पक्षाच्या दिल्लीतून आलेल्या नेत्यांसोबत आमदारांनी चर्चा केली. यानंतर भूपेंद्र पटेल यांचे नाव मुख्यमंत्री या पदासाठी निश्चित झाले. सोमवारी त्यांचा शपथविधी होणार आहे.

याआधी आमदारांच्या बैठकीत गुजरातचे हंगामी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल, केंद्रीयमंत्री मनसुख मांडविया, पर्यवक्षेक म्हणून केंद्रीयमंत्री नरेंद्रसिंह तोमर आणि प्रल्हाद जोशी, प्रभारी भूपेंद्र यादव यांच्यासह गुजरातमधील भाजपचे आमदार उपस्थित होते. बैठक भाजपच्या गुजरात प्रदेश कार्यालयात पार पडली.

Advertisements

Related Stories

काश्मीरी पंडित शिक्षिकेची हत्या

Patil_p

अर्थव्यवस्था पुन्हा रूळावर ?

Patil_p

जागतिक हवामान परिषद पुढील महिन्यात

Patil_p

कानपूरमध्ये भरदिवसा माजी बसपा नेत्याची गोळ्या घालून हत्या

Rohan_P

अमरनाथ यात्रेवर शस्त्रात्रांच्या तस्करीचे संकट

Kalyani Amanagi

“…तर डोळे फोडून हात कापून टाकू;” भाजपा खासदाराने काँग्रेस नेत्यांना धमकावलं

Abhijeet Shinde
error: Content is protected !!