Tarun Bharat

“भोकं पडलेल्या फुग्याला राऊत एवढे का घाबरतात?”, गोपीचंद पडळकरांची खोचक टीका

मुंबई/प्रतिनिधी

महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. यांनतर त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. परंतु नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. आता आमदार गोपीचंद पडळकरांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले खासदार संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असं तर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल अशी टीका केली आहे.

राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता, मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल असा प्रश्न पडलकरांनी उपस्थित केला आहे.

Related Stories

साताऱयात अन्यायकारक घरपट्टी वाढ होऊ देणार नाही

Patil_p

शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारीला

datta jadhav

‘ त्या ‘ बाधीत रुग्णाने गावचे नाव सांगितले खोटे, रुग्ण तळसंदेचा असल्याचे स्पष्ट

Archana Banage

मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना कोरोनाचा संसर्ग

Tousif Mujawar

राज्यातील भाजप नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक

Abhijeet Khandekar

प्रसिद्ध गायक एस. पी बालसुब्रमण्यम यांचे निधन

Patil_p