Tarun Bharat

भोसरीत नव्या रुग्णालयाचा खेळखंडोबा

 पिंपरी / प्रतिनिधी :

पदाधिकाऱयांकडून खासगीकरणाचा अट्टहास, विरोधकांचा प्रचंड विरोध, राज्य सरकारला तक्रारी, प्रशासनाचा सुस्त कारभार या सर्वांमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरीतील नवीन हॉस्पिटलचा खेळखंडोबा झाला आहे.

 हॉस्पिटलची इमारत बांधून तयार आहे. मात्र, हॉस्पिटल चालविणार कोण हेच ठरवायला सत्ताधारी आणि प्रशासन असमर्थ ठरले असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरीत 100 खाटांच्या क्षमतेचे रुग्णालय उभारण्यात आले आहे.

 वायसीएम रुग्णालयात पुरविल्या जाणाऱया 16 विशेष वैद्यकीय सुविधा या रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय वायसीएम रूग्णालयातही उपलब्ध नसलेल्या सुपर स्पेशालिटी प्रकारातील 10 सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. त्यामध्ये व्हॅस्कुलर सर्जरी, न्यूरोलॉजी, प्लास्टिक सर्जरी, यूरो सर्जरी, कार्डीओ-थोरासिक, नेप्रझॉलॉजी, ऑन्कॉलॉजी, एन्डोक्रिनालॉजी, गॅस्ट्रो एन्ट्रॉलॉजी तसेच पेडीट्रीक सर्जरी या अत्याधुनिक उपचार पद्धतींचा समावेश केला जाणार आहे.

Related Stories

मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर रामभाऊ गायकवाड यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Archana Banage

रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू, कामगारांचे काम बंद आंदोलन

Archana Banage

विरोधी पक्षनेते अक्कलकोटेंसह नऊ जण निर्दोष

Archana Banage

सोलापूर : माढा तालुक्यात आज ३८ जण कोरोना बाधित

Archana Banage

रामपूरमध्ये नियमबाह्य विवाह; पन्नास हजाराचा दंड

Archana Banage

सोलापूर : पंढरपूर सबजेलमध्ये 21 कैदी कोरोना बाधित

Archana Banage