Tarun Bharat

भोसे येथील विपुल इंगवले यांना वीरमरण

वार्ताहर/ एकंबे

भोसे (ता. कोरेगाव) येथील सैन्य दलातील जखमी जवान विपुल दिलीप इंगवले यांची रविवारी पुणे येथे लष्करी रुग्णालयात उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली. मागीलवर्षी सियाचिनमध्ये कर्तव्यावर हजर असताना, बर्फवृष्टीमध्ये सापडल्याने ते जखमी झाले होते. त्यांच्यावर प्रारंभी दिल्ली येथे, त्यानंतर पुणे येथील सैन्य दलाच्या रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्यावर सोमवारी सकाळी भोसे गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

त्यांच्या पश्चात पत्नी, सहा महिन्यांची मुलगी, आई, वडील, दोन विवाहीत बहिणी व भाऊ असा परिवार आहे. सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या विपुल यांनी गावातच माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर रयत शिक्षण संस्थेच्या कोरेगाव येथील डी. पी. भोसले कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण घेतले. याकाळात उत्कृष्ट बॉक्सर म्हणून पुढे आले. एन. सी. सी. कॅडेट म्हणून त्यांनी उठावदार कामगिरी केली होती. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

बुकी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक

datta jadhav

जादा दराने रासायनिक खतांची होणारी विक्री थांबवा

Archana Banage

समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स उलटली; १५ जण गंभीर

datta jadhav

संजय राठोड वादात बंजारा समाजाची उडी; चित्रा वाघ यांनी राठोडांना राखी बांधावी, महंतांचा इशारा

Abhijeet Khandekar

भाजपच्या ‘त्या’ टीकेला नितीन राऊतांचे प्रतिउत्तर

Archana Banage

कोल्हापूर : तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर महामार्गावरील वाहतूक सुरु

Archana Banage