Tarun Bharat

भोस्ते घाटात 30 फूट दरीत टँकर कोसळला

Advertisements

प्रतिनिधी/ खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात टँकर 30 फूट दरीत कोसळून अपघात घडल्याची घटना शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली. चालक चंद्रप्रकाश आनंदकुमार श्रीवास्तव (41, अलहाबाद-उत्तरप्रदेश) केबिनमध्ये अडकला. मोठय़ा प्रयत्नानंतर त्यास बाहेर काढून कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.

चालक चंद्रप्रकाश टँकर (जीजे 06/एक्सएक्स 9875) घेवून बेंगलोर येथून महाडला जात होता. भोस्ते घाटातील अवघड वळणावर टँकरवरील ताबा सुटून तो उजव्या बाजुचा कठडा तोडून 30 फूट दरीत कोसळला. अपघाताचे वृत्त कळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, वैशाली आडुरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल भूषण सावंत, कशेडी येथील वाहतूक पोलीस उपनिरीक्षक यशवंत बोडकर व सहकारी, मदत ग्रुपचे प्रसाद गांधी, रोहन इनरकर, रोहित इनरकर, अमित वानकडे घटनास्थळी पोहोचले. टँकरच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकास मोठय़ा प्रयत्नानंतर बाहेर काढण्यात यश आले. त्याच्या हाताला व पायाला गंभीर दुखापती झाल्या असून त्याच्यावर कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरून धावणाऱया वाहनांचा काही काळ खोळंबा झाला.

Related Stories

जिह्यात कोरोनाचे 21 नवे रुग्ण

Patil_p

कारवाई करुनही गुरे वाहतूक थांबता थांबेना!

Patil_p

रॉक गार्डनचे सौंदर्य अधिक खुलणार

NIKHIL_N

घरपट्टी विरोधाचा ठराव सहा महिन्यापूर्वीच

NIKHIL_N

कोकण मार्गावर आजपासून मडगाव-मुंबई फेस्टिवल स्पेशल

Patil_p

एसटीच्या उत्पन्नात दोन लाखांनी वाढ

Patil_p
error: Content is protected !!