ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्ण संख्येने दीड लाखांचा टप्पा पार केला आहे. ह्या संकटाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात ठाकरे सरकारने 31 जुलैपर्यंत लॉक डाऊन वाढविला असून काही नवीन बंधने टाकली आहेत.
लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे. ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत देण्यात आलेल्या सवलती, नियमांमधील शिथीलता कायम राहील, असंही या आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत जोरदार टीका केली आहे.


चंद्रकांत पाटील आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, महाराष्ट्रात लॉक डाऊन की अनलॉक ?अर्थचक्र फिरले पाहिजे, पुनश्च हरी ओम झाले पाहिजे म्हणणारे हे “भ्रमित ठाकरे” सरकार जनतेला फक्त दोन किमी पर्यंत वाहतुकीला परवानगी देण्याच्या जुलमी निर्णयाने अधिकच संभ्रमात टाकत आहे.
पुढे ते म्हणाले, काय ते एकदा ठरवा अर्थचक्र फिरवायचे का दोन किमी मध्येच फिरायचे, तातडीने निर्णय घ्या जनतेचा संभ्रम दूर करा. असे त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.