Tarun Bharat

भ्रष्टाचारप्रकरणी मलेशियाच्या माजी पंतप्रधानांना 12 वर्षांचा तुरुंगवास

ऑनलाईन टीम / कुआलालंपूर : 

मलेशिया डेव्हलपमेंट बरहाद (1एमडीबी) स्टेट फंडात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याप्रकरणी मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रझाक यांना मलेशिया हायकोर्टाने दोषी ठरवले आहे. नजीब भ्रष्टाचाराच्या सात प्रकरणात दोषी आढळल्याने त्यांना 12 वर्ष तुरूंगवास आणि 210 दशलक्ष रिंगिट (49.4 दशलक्ष डॉलर) दंडाची शिक्षा न्यायमूर्ती मोहम्मद गजाली यांनी सुनावली.

नजीब यांनी सत्ता आणि अधिकाराचा गैरवापर करीत देशाचे कोट्यवधी रुपये लुटले, असा ठपका न्यायालयाने ठेवला आहे. 94 दिवस त्यांच्याविरोधात हा खटला सुरू होता. गैरव्यवहाराच्या या प्रकरणामुळे दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मलेशियातील नजीब यांचे सरकार कोसळले होते. 

सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी 12 वर्ष, 3 गुन्हेगारी विश्वासाचे उल्लंघन केल्याबद्दल10 वर्षे आणि मनी लॉन्डरिंगच्या 3 प्रकरणात त्यांना 10 वर्षे तुरुंगवास तसेच 210 दशलक्ष रिंगिट दंड ठोठावण्यात आला. परंतु, त्यांना या सर्व शिक्षा एकाचवेळी भोगण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे त्यांना एकूण 12 वर्ष तुरुंगात रहावे लागणार आहे.

Related Stories

तालिबानकडून महिलांवर कठोर निर्बंध

Patil_p

पाणी वाचविणाऱया जीवाणूचा शोध

Amit Kulkarni

दिल्ली कॅपिटल्स-सीएसके आज आमनेसामने

Omkar B

नितीन गडकरींनी सांगितली कामं करून घेण्याची त्यांची पद्धत!

Archana Banage

शरद पवारांचा सल्ला घेण्यात गैर काय : संजय राऊतांचा सवाल

Tousif Mujawar

ज्येष्ठ पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर यांचं निधन

Archana Banage