Tarun Bharat

भ्रष्टाचार करणाऱयांना सातारकरांनी घरी बसवावे

प्रतिनिधी/ सातारा

तरुण पिढी लोकांच्या हाकेला लगेच धावून येते. त्यांच्यामध्ये काम करण्याची उर्मी असते. तरुण पिढीला पुढे आणणे गरजेचे आहे. माझी हिच इच्छा आहे की तरुणांना सातारकरांनी पुढे आणावे. मात्र, काही मंडळी खुर्च्या धरुन वर्षानुवर्ष बसलेली आहेत. अनेक पदे भुषवली असून पदाच्या माध्यमातून स्वतःची घरे भरली आहेत. अशा सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी त्यांच्यातील पदाधिकाऱयांचे पितळ उघडे पाडले होते. अशा भ्रष्टाचारी नगरसेवकांना सातारकरांनी घरी बसवावे, असे आवाहन आमदार शिवेंद्रराजेंनी केले.

   नगरसेवक रवी ढोणे यांच्या प्रयत्नातून मांढरे आळी ते सचिन राजेशिर्के घर या रस्त्याच्या कामाचा नारळ फोडण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक धंनजय जांभळे, पप्पू लेवे, धनंजय शिंदे, गजेंद्र ढोणे यांच्यासह पेठेतील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, आज मांढरे आळी ते राजेशिर्के घर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ झाला आहे. अनेक दिवसांपासून काम होत होते. नगरपालिकेचे सत्तारुढ पार्टीकडून याकडे दुर्लक्ष केले जात होते. आज नगरसेवक रवी ढोणे यांच्या माध्यमातून या रस्त्याला 25ः15 मधून निधी आजितदादांच्या माध्यमातून आणला गेला. हा रस्ता होत आहे. रवीचे काम सगळया प्रभागात चांगले आहे. मला नक्की खात्री आहे. पुढे सुद्दा रवी ढोणे नगरसेवक म्हणून असतील. त्यांचे इतर सहकारी मित्र असतील पप्पू लेवे, पिंटू जांभळे, गजेंद्र या सर्वांच्या माध्यमातून या भागाचा चांगल्या पद्धतीने नियोजित असा विकास कायम होत राहिल. नागरिकांनी या सर्व तरुणांना साथ द्यावी. कामे पाहिजे असतील तर तरुण पिढीला पुढे आणणे गरजेचे आहे. जुन्याचे तेच तेच अनुभव नागरिकांना येत असतात. तरुणांच्या हातात सत्ता दिली तर चांगले काम करण्याची त्यांची इच्छा असते. नागरिकांच्या हाकेला धावून जाण्याची तयारी तरुणांची असते. माझी हीच अपेक्षा आहे की नागरिकांनी सुद्धा तरुणांकडे लक्ष द्यावे. जुनी वर्षानुवर्ष खुर्च्यां धरुन बसलेली मंडळी आहेत. ज्यांनी पदे भुषवलेली आहेत. अनेक पदाच्या माध्यमातून स्वतःची घरे भरली. भ्रष्टाचाराचे उद्योग केले. त्यांच्याच सातारा आघाडीच्या नगरसेवकांनीच त्यांचे पितळ उघडे पाडले आहे. अशा नगरसेवकांना आता सातारकरांनी घरी बसवले पाहिजे. योग्य नगरसेवकांना आणि आपल्या ऐकण्यात राहतील अशा नगरसेवकांना निवडून द्यावे,. असे आवाहन त्यांनी केले. पुढे ते म्हणाले, रवी ढोणे यांच्यावर ऍट्रोसिटीवरचा खोटा गुन्हा आहे. पोलिसांनी तपास केल्यावर रवी ढोणे कुठे होते समजेल. ऍट्रोसिटीचा गैरवापर केला जात आहे. सार्वजनिक कामात आडगे पडायचे ही काही मंडळींची ख्याती आहे. रवी ढोणे यांना त्रास देण्याचा प्रकार आहे, असेही त्यांनी सांगितले.

फटाके फोडून आणि औक्षण करुन बाबाराजेंचे स्वागत

बाबाराजे मनामती चौकात येताच कार्यकर्त्यांनी त्यांचे फटाके फोडून त्यांचे स्वागत केले. प्रभागातील महिलांनी त्यांचे औक्षण केले. प्रभागातील नागरिकांनी आर्वजून हजेरी लावली होती. झालेली गर्दी पाहूनच नगरसेवक रवी ढोणे यांच्या कार्याची पोहच मिळाल्याची चर्चा सुरु होती.

Related Stories

मुंबईसह ठाण्यात निर्बंध झुगारुन मनसेने फोडली दहीहंडी

Archana Banage

जि.प. सदस्य राहुल आवाडे दुसऱ्यांदा कोरोना पॉझीटिव्ह

Archana Banage

टपऱयांच्या जागेवर खड्डी-मातीचा ढिग

Patil_p

कोरोना संकट; विश्वकर्मा समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी

Archana Banage

मराठा आरक्षण मुद्दा राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात पेटण्याची शक्यता

Archana Banage

शिक्षक संघाच्या शिवाजीराव पाटील गटास न्यासाची मान्यता

Archana Banage