Tarun Bharat

मँगो शिरा

साहित्य : 1 वाटी रवा, 1 पिकलेला आंबा, पाव वाटी अथवा चवीपुरती साखर, 2 चमचे तेल अथवा तूप, 1 वाटी दूध, 3 वेलची, 1 वाटी पाणी, पाव वाटी सुकामेवाः काजू, बदाम, बेदाणे, पिस्ता, चारोळी, चिमुटभर केशरकाडय़ा 

कृती : वेलची सोलून पावडर बनवून घ्यावी.  आंबा सोलून त्याचा गर काढून घ्यावा. कढईत तूप गरम करून त्यात रवा चांगला खरपूस परतवून घ्यावा. त्याच गरम तुपात सुकामेवा परतवून घ्यावा. दुसऱया पातेल्यात पाणी गरम करण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आली की त्यात भाजलेला रवा मिक्स करावा. नंतर त्यात सुकामेवा घालावा. आता साखर आणि दूध मिक्स करून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात आंब्याचा गर घालून मिश्रण चांगले एकजीव होईपर्यंत मिक्स करावे. वरून वेलची पावडर आणि केशर घालावे.

मिश्रण दोन मिनिटे मंद आचेवर ठेवून त्यावर झाकण ठेवावे. नंतर आच बंद करून तयार शिरा बाऊलमध्ये काढून चारोळीने सजवून खाण्यास द्या.

Related Stories

सोया पुरी

Omkar B

मुळा बेसन

Omkar B

भाजी खाऊन कंटाळा आलाय मग ट्राय करा कुरकुरीत भेंडी फ्राय

Kalyani Amanagi

नुडल्स रोल

Omkar B

काजू ग्रेव्ही

tarunbharat

घरच्या घरी तव्यावर बनवा टोस्ट पिझ्झा

Kalyani Amanagi