Tarun Bharat

मँचेस्टर युनायटेड पुनरागमनात रोनाल्डोचे 2 गोल

मँचेस्टर / वृत्तसंस्था

पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने मँचेस्टर युनायटेडमधील आपले पुनरागमन 2 शानदार गोलनी साजरे केले. शनिवारी ओल्ड ट्रफोर्ड स्टेडियमवर न्यू कॅसल युनायटेडविरुद्ध इंग्लिश प्रीमियर लीग सामन्यात त्याने दोन्ही सत्रात गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आणि आपल्या नव्या प्रवासाची दमदार सुरुवात केली. मँचेस्टर युनायटेडने या लढतीत 4-1 फरकाने विजय संपादन केला. रोनाल्डो मागील महिन्यात मँचेस्टर युनायटेड संघाशी करारबद्ध झाला आहे.

रोनाल्डोने येथे न्यू कॅसलचा गोलकिपर प्रेडी वूडमनला जादा वेळेत लो ड्राईव्हवर चकवले आणि मँचेस्टर युनायटेड संघात दुसऱयांदा दाखल झाल्यानंतर पहिल्याच लढतीत गोल खाते उघडले. पोर्तुगीज संघातील राष्ट्रीय सहकारी मॅसॉन ग्रीनवूडच्या पासवर अगदी जवळून रोनाल्डोला पहिला गोल करणे सहज शक्य झाले. नंतर दुसऱया सत्रात 62 व्या मिनिटाला त्याने आणखी एक गोल केला. युनायटेडतर्फे ब्रुनो फर्नांडेसने 80 व्या मिनिटाला तर जेसे लिंगार्डने अतिरिक्त वेळेत दुसऱया मिनिटाला गोल करत युनायटेडची आघाडी भक्कम केली. न्यू कॅसलचा एकमेव गोल 56 व्या मिनिटाला जेवियरने केला.

या सामन्याच्या प्रारंभी, किक ऑफपूर्वी दोन्ही संघातील खेळाडू मैदानावर आले आणि त्यानंतर मँचेस्टर युनायटेडच्या चाहत्यांनी रोनाल्डोचे जोरदार स्वागत केले. 36 वर्षीय रोनाल्डोने 2003 ते 2009 या कालावधीत युनायटेड संघाचे प्रतिनिधीत्व केले असून त्यावेळी त्याने 8 मेजर ट्रॉफी जिंकून दिले आहेत. मागील महिन्यात त्याने युवेन्टस संघातून बाहेर पडल्यानंतर मँचेस्टर युनायटेड क्लबशी दोन वर्षांचा करार केला.

Related Stories

स्पर्धकांना पूर्ण वेळ मास्कची सक्ती

Amit Kulkarni

दुसऱया कसोटीसाठी लंका संघ जाहीर

Patil_p

नापोली अंतिम फेरीत, मर्टेन्सचा विक्रमी गोल

Patil_p

बहरिन, बेलारुसविरुद्ध भारताच्या मैत्रिपूर्ण लढती

Patil_p

नितू, सवीती, बोर्गोहेन, निखत झरीन सुवर्णपदकासह वर्ल्ड चॅम्पियन्स

Patil_p

लोवलिनाला ऐतिहासिक कांस्य

Patil_p