Tarun Bharat

मंकी हिल-कर्जत घाट क्षेत्रात दुरुस्तीकामांमुळे अनेक गाडय़ा रद्द

Advertisements

मुंबई / प्रतिनिधी

मुंबई ते पुणे मार्गावरील मंकी हिल ते कर्जत घाट क्षेत्रात तांत्रिक कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे मेल-एक्प्रेस गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. यामुळे अनेक गाडय़ा रद्दही करण्यात आल्या आहेत. मंकी हिल ते कर्जत घाट क्षेत्रातील ही तांत्रिक कामे 20 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहेत. या काळात भुसावळ ते पुणे ते भुसावळ एक्प्रेस 17 जानेवारी ते 20 जानेवारीपर्यंत मनमाड, दौंडमार्गे धावणार असून सीएसएमटी ते कोल्हापूर ते सीएसएमटी कोयना एक्प्रेस ही याच कालावधीत पुण्यापर्यंत धावणार असून पुण्यातूनच सुटणार आहेत.

रद्द झालेल्या गाडय़ा

       गाडी                       रद्द राहण्याचा कालावधी

पुणे ते पनवेल ते पुणे पॅसेंजर            16 ते 20 जानेवारीपर्यंत

सीएसएमटी ते पंढरपूर पॅसेंजर           16 ते 18 जानेवारीपर्यंत

पंढरपूर ते सीएसएमटी पॅसेंजर           17 ते 19 जानेवारीपर्यंत

सीएसएमटी-विजापूर-सीएसएमटी पॅसेंजर   15, 16 आणि 20 जानेवारी

दौंड-साईनगर शिर्डीöदौंड पॅसेंजर         15 ते 20 जानेवारी

Related Stories

भाजप-शिवसेना युतीमुळेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग मोकळा

datta jadhav

साहसी पर्यटनाबाबत लवकरच नियमावली जाहीर करण्यात येणार – आदित्य ठाकरे

Abhijeet Shinde

”ममता बॅनर्जी एकटी वाघीण सर्वांना पुरुन उरेल”

Abhijeet Shinde

#NashikOxygenLeak : बेपर्वाई झाली असेल तर सरकारकडून कडक शासन व्हायलाच हवं-राज ठाकरे

Abhijeet Shinde

रंगकर्मींच्या प्रश्नांसंदर्भात टास्क फोर्सशी चर्चा करुन निर्णय घेणार – अमित देशमुख

Abhijeet Shinde

सलमान खानला मारण्यासाठी 30 लाखांची सुपारी

tarunbharat
error: Content is protected !!