Tarun Bharat

मंगलदास मांद्रेकर काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते

प्रतिनिधी / म्हापसा

मंगलदास मांद्रेकर हे काँग्रेसचे निकटवर्तीय कार्यकर्ते होते. त्यांनी या पक्षासाठी सदैव तळागळातील लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला. आपले एक जवळचे मित्र होते. त्यांच्या निधनाने आम्ही एक सच्चा कार्यकर्त्याला मुकलो आहोत. काँग्रेसचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आम्हाला सोडून गेला. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख झेलण्याची ईश्वर शक्ती देवो असे माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत म्हणाले. शोकाकूल वातावरणात आसगाव स्मशानभूमीत मांद्रेकरांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले की, मंगलदास एक निष्ठावंत कार्यकर्ते होते. समाजसेवेला त्यांचा हात धरणारा कुणी नाही. त्यांची कुठलीच अपेक्षा नव्हती. ते आपल्या भावाप्रमाणे होते. राहुल गांधी म्हटले की ते धाव घ्यायचे. 35 हजाराची तिकीटही काढून त्यांनी त्यांची रॅली दिल्ली येथे केली होती. त्यांच्या जाण्याने आम्हाला एक पोकळी निर्माण झाली आहे असे ते म्हणाले.

शिवसेना गोवा राज्यप्रमुख जितेश कामत म्हणाले की, मंगलदास एक चांगले व्यक्तिमत्त्व जे सदैव मदतीला पुढे सरकत होते. आपले त्यांचे पूर्वीपासून घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख झेलण्याची शक्ती ईश्वर देवो असे ते म्हणाले. आमदार विनोद पालयेकर म्हणाले की, मंगलदास काँग्रेस पक्षाचे खंदे कार्यकर्ते होते. सुंदर अशा विचारांचा सर्वांना बोरबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व त्यांच्या निधनाने आम्ही आमच्या एका चांगल्या मित्राला मुकलो असल्याचे ते म्हणाले.

वेर्ला काणका सरपंच मिल्टन मार्कीस, मसाजसेवक दत्ताराम पेडणेकर यांनी श्रद्धांजली वाहताना काँग्रेस पक्षाचे मांद्रेकर एक निष्ठावंत कार्यकर्ते होते असे ते म्हणाले. त्यांची पक्षाशी सदैव तळमळ होती. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी असल्याचे ते म्हणाले. म्हापसा अर्बन बँकेचे चेअरमन गुरुदास नाटेकर यांनी मंगलदास आपल्या बोरबर पूर्वीपासून होते. आपणच त्यांना काँग्रेस पक्षात आणले होते. पक्षाचे कार्य वाढविण्यासाठी आम्ही सदैव एकत्रित झटलो असल्याचे ते म्हणाले.

Related Stories

अनेक गावांमध्ये कोरोनाचा विळखा

Patil_p

सांगेतील ‘वरुण बिव्हरेजिस’कडून 130 कामगारांची सेवा खंडित

Omkar B

फोंडय़ात 20 पासून द्राक्ष महोत्सव

Amit Kulkarni

कचऱयाची समस्या सोडविण्यासाठी लोकांचेही सहकार्य महत्वाचे

Amit Kulkarni

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांचा तुयेत सत्कार

Amit Kulkarni

प्रत्येक कुटूंब भाजपमय करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

Patil_p