Tarun Bharat

‘मंगलाष्टक रिटर्न’मध्ये वृषभ-शीतलची जोडी

Advertisements

पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टी चित्रपटगृह हाऊसफुल्ल करण्यासाठी सज्ज झाली आहे. वेगवेगळ्या धाटणीच्या कथा, सादरीकरण यासह आता सिनेमात कलाकारांच्या नव्या प्रेश जोडय़ा आणण्याकडेही सिनेमाकर्त्यांचा कल आहे. नवीन जोडय़ांचा हा ट्रेंड सुरु असताना लवकरच अभिनेता वृषभ शहा आणि अभिनेत्री शीतल अहिरराव यांच्या नव्या जोडीची पर्वणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्यांदाच एकत्र काम करत असलेल्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री निर्माता वीरकुमार शहा आणि ‘शारदा प्रॉडक्शन’ या प्रॉडक्शन हाऊसतर्फे प्रेक्षकांच्या मनोरंजनास सज्ज आहे.चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक योगेश भोसले यांनी सांभाळली आहे.

  सातत्याने नवे कोरे आणि चौकटी बाहेरचे विषय असलेले चित्रपट स्वीकारणारी शीतल आणि दमदार भूमिका स्वीकारत नवकलाकार म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस आलेला वृषभ शहा या चित्रपटातून आपली कला नक्कीच प्रेक्षकांच्या मनावर उमटवतील यांत शंकाच नाही. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून थिएटर चालू होताच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज आहे. अभिनेता प्रसाद ओक, आनंद इंगळे, प्रसन्न केतकर, कमलेश सावंत, भक्ती चव्हाण हे कलाकार मुख्य भूमिका साकारणार आहेत. ही जोडी वेगळ्या धाटणीच्या या सिनेमातून सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य नक्कीच गाजवेल याची खात्री आहे.

संकलन – अनुराधा कदम

Related Stories

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

Rohan_P

गाडीच्या डिक्कीत लपायची जान्हवी कपूर

Patil_p

रश्मिका मंदाना टॉप इन्स्टाग्राम सेलेब्रिटी

Patil_p

पुष्कर जोग – सई लोकुर यांची सनम हॉटलाईन

Patil_p

कंगनाच्या अडचणीत वाढ! पासपोर्ट नूतनीकरणास प्राधिकरणाचा नकार

Rohan_P

चौथ्यांदा विवाह करण्याच्या तयारीत जेनिफर

Patil_p
error: Content is protected !!