Tarun Bharat

मंगला अंगडी यांच्या प्रचाराला वेग

रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्मयांसह ग्रामीण मतदारसंघात गाठीभेठी

प्रतिनिधी / बेळगाव

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपनेही प्रचारामध्ये आघाडी घेतली आहे. भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी यांनी मंगळवारी रामदुर्ग, सौंदत्ती तालुक्मयांमध्ये जोरदार प्रचार केला. विविध मंदिरांमध्ये जाऊन आशीर्वाद घेऊन त्यानंतर प्रचाराला त्यांनी सुरुवात केली आहे.

सौंदत्ती तालुक्मयातील शिरसंगी गावात जाऊन मंगला अंगडी यांनी मतदारांना भाजपला विजयी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. दिवंगत सुरेश अंगडी यांचे कार्य जे अर्धवट राहिले आहे ते पूर्ण करायचे आहे. तेव्हा मला संधी द्या. मी निश्चितच या संधीचे सोने करू, असे मंगला अंगडी यांनी यावेळी मतदारांना सांगितले.

होळीमठ गावात जाऊनही त्यांनी प्रचार केला. सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्मयांमध्ये जोरदार प्रचार करण्यात आला. भर उन्हामध्ये मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या. यावेळी त्यांच्या सोबत भाजपचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

ग्रामीण मतदार संघातही प्रचार

प्रचारासाठी आजी-माजी आमदार विविध भागांमध्ये जाऊन गाठीभेटी घेत आहेत. मंगळवारी ग्रामीण मतदार संघामध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांनी सहकाऱयांसमवेत सावगाव, ज्योतीनगर, गोकुळनगर, लक्ष्मीनगर-हिंडलगा या गावांमध्ये जाऊन प्रचार केला. यावेळी त्यांच्या सोबत भाजप मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, भारती मगदूम, चेतन अंगडी, माजी आमदार मनोहर कडोलकर, शिवाजी सुंठकर, तालुका कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकांत थोरवत, भाग्यश्री कोकितकर यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

अनगोळ येथील विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Amit Kulkarni

देवरवाडी-महिपाळगड बससेवा बंद

Amit Kulkarni

पंचमसाली समाजाचा प्रवर्ग-2 मध्ये समावेश करा

Amit Kulkarni

तलावात बुडून मुलाचा मृत्यू

Tousif Mujawar

स्मार्ट रस्त्यावरच कचऱयाची समस्या

Patil_p

ग्रा.पं.कॉम्प्युटर ऑपरेटरची अद्याप कमतरता

Amit Kulkarni