Tarun Bharat

मंगळवारीही बाजार सुरू

प्रतिनिधी/ बेळगाव

सरकारने रविवारी लॉकडाऊन जाहीर केले आणि पुन्हा बाजारपेठेचे गणित बदलले. बेळगावच्या बाजारपेठेने वर्षानुवर्षे मंगळवार हा सुटीचा वार म्हणून जाहीर केला आणि मंगळवारी बहुतांश व्यवहार बंद राहत असत. मात्र आता हळूहळू बेळगाव बाजारपेठेत रविवार हा सुटीचा दिवस होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मंगळवारी सकाळी बाजारपेठेचा फेरफटका मारला असता असंख्य दुकाने सुरू असल्याचे आढळून आले. बाजारपेठेत खरेदीसाठीही मंगळवारी कमालीची गर्दी झाली. वास्तविक रविवार सुटीचा दिवस. त्या दिवशी कुटुंबासमवेत खरेदीला बाहेर पडायचे, अशी एक प्रथा नकळत तयार झाली होती. बेळगाव बाजारपेठेत गोवा, चंदगड, हुबळी येथील ग्राहकसुद्धा खरेदीला येतात.

मात्र कोविड-19 मुळे गोवेकर ग्राहकांची मोठी पंचाईत झाली आहे. बेळगावला मिळणारा भाजीपाला, कडधान्य आणि मिठाई याचे मोठे आकर्षण गोवेकरांना आहे. परंतु गेल्या तीन-चार महिन्यांपासून गोवेकर या खरेदीला मुकले आहेत. त्यांच्याबरोबरच बेळगावच्या ग्राहकांचीसुद्धा मोठी गैरसोय झाली. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर बेळगाव बाजारपेठेत गर्दी दिसू लागली आहे. दरम्यान, यापुढे रविवारी लॉकडाऊन होणार असल्याने व्यापाऱयांनी, दुकानदारांनी मंगळवारी दुकाने आणि उद्योग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत व्यापारी संघटना किंवा दुकानदारांची कोणतीही बैठक झालेली नाही. तथापि, लॉकडाऊनमुळे दोन-तीन महिने बरेच आर्थिक नुकसान झाले. रविवारी पुन्हा सर्व दुकाने व उद्योग सक्तीने बंद ठेवावे लागणार आहेत. अशा परिस्थितीत मंगळवारी जर नेहमीप्रमाणे सुटी घेतली तर आता हे नुकसान परवडणारे नाही, असा विचार करून मंगळवारी बेळगाव बारजारपेठ सुरू राहिली. 

Related Stories

बेळगाव तालुक्यातील तिघांना कोरोनाची बाधा

Patil_p

खानापूर न्यायालयाच्या पहिल्या मजल्याचे उद्घाटन

Amit Kulkarni

थंडीत उबदार कपडय़ांना पसंती

Amit Kulkarni

अर्भकाच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबीयांचे धरणे

Omkar B

विविध बँकांकडून आयसोलेशन सेंटरला मदत

Amit Kulkarni

शेखर टेकन्नवर बेळगावचे नूतन डीसीपी

Rohit Salunke