Tarun Bharat

मंगळवारीही वळिवाच्या आगमनाने तारांबळ

Advertisements

बाजारपेठेतील फेरीवाले, व्यापाऱयांसह भाजीविपेत्यांची धावपळ : पिकांसह वीटभट्टी व्यावसायिकांचेही मोठे नुकसान

प्रतिनिधी /बेळगाव

सोमवारी शहरासह ग्रामीण भागात जोरदार वारा आणि वीजेसह पावसाचे आगमन झाल्यानंतर मंगळवारीही दुपारी पावसाचे आगमन झाले. मात्र थोडावेळच पाऊस पडला. त्यानंतर पुन्हा अधिक उष्मा जाणवत होता.

दुपारी 2.30 च्या सुमारास पावसाचे आगमन झाले. जोरदार पाऊस पडेल, अशी शक्मयता होती. मात्र काहीवेळ पाऊस पडून त्यानंतर पाऊस गायब झाला. परिणामी उष्म्यात आणखी वाढ झाली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाले, बैठे भाजीविपेते व इतर व्यापाऱयांची तारांबळ उडाली होती. दुचाकीस्वारांनाही आडोसा शोधावा लागला. काहीवेळ पाऊस झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.

दरवषीच वळिवाच्या दणक्मयामुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान होत आहे. यावषीही वळिवाने शेतकऱयांचे नुकसान केले असून शेतकरी मोठय़ा अडचणीत येण्याची शक्मयता व्यक्त होत आहे. मार्चमध्येच वळिवाचे आगमन होत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. 

तालुक्यात अवकाळी पावसाची पुन्हा हजेरी

बेळगाव तालुक्यात मंगळवारी दुपारी अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. वारंवार होणाऱया अवकाळी पावसामुळ रब्बी हंगामातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे.

सोमवारी तालुक्यात काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या, विजांचा कडकडाट झाला. मंगळवारी दुपारी तालुक्याच्या सर्रास भागाला अवकाळी पावसाने झोडपले. वादळी वाऱयामुळे काही गावांमध्ये इमारतींवरील पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले. तसेच झाडे उन्मळून पडली होती. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. उद्यमबाग परिसरात बेळगाव-पणजी महामार्गावर पावसाचे पाणी आले होते.

अवकाळी पावसामुळे शेतातील हरभरा, वाटाणा, मसूर, ज्वारी व भाजीपाला पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. तालुक्याच्या पश्चिम भागात बटाटा काढणीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, पावसामुळे बटाटा काढणीला व्यत्यय निर्माण झाला.

गाजर, कोथिंबीर, लाल भाजी या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. मच्छे, पिरनवाडी, खादरवाडी, झाडशहापूर, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी या भागातील शेतकऱयांनी काकडी, कलिंगड यांची लागवड केली आहे. काकडी व कलिंगड बहरून येत असताना पाऊस पडल्याने दोन्ही पिके खराब होत असून शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

देसूर, राजहंसगड परिसरात विटांचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेण्यात येते. या भागात वीट व्यवसाय हा मुख्य असून वीटभट्टी लावण्याचे काम सुरू आहे. मात्र, सततच्या पावसाने विटांचेही नुकसान झाले असून वीट व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत.

कंग्राळी खुर्द परिसरात मिरची पिकाचे नुकसान

कंग्राळी खुर्द परिसरात जोरदार वाऱयासह झालेल्या पावसामुळे शेतातील बहरलेले मिरची पीक आडवे पडून शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे. येथील प्रगतशील शेतकरी वाय. आर. पाटील यांनी 20 गुंठे परिसरात मिरची पिकाची लागवड केली आहे. सध्या मिरचीचे पीक बहरून आले आहे. झाडांची उंची तीन फुटापेक्षा अधिक वाढली आहे. मात्र पावसामुळे सर्व मिरचीची झाडे आडवी झाली असून मोठा आर्थिक फटका बसला आहे.

यावर्षी मिरचीला बाजारात चांगला दर आहे. कोरोनामुळे दोन वर्षे उत्पादकांचे दर नसल्यामुळे कंबरडेच मोडले होते. काही शेतकऱयांनी मिरची पिकावरच ट्रक्टर फिरविला होता. मात्र यंदा थोडी आर्थिक मदत होईल, या आनंदात असताना सोमवारी पुन्हा अवकाळीने मिरची पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

Related Stories

पशुवैद्यकीय अधिकारी शेतकऱयाच्या बांधावर

Amit Kulkarni

अयोध्यानगर प्रवेशद्वारावर खड्डय़ांचे साम्राज्य

Amit Kulkarni

ज्योती सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Amit Kulkarni

गोवावेस बसवेश्वर सर्कलमध्ये साचले पावसाचे पाणी

Amit Kulkarni

सुभाषनगर कोविड सेंटरमध्ये 45 बाधितांवर उपचार

Amit Kulkarni

लोकमान्यच्या भाग्यनगर शाखेमध्ये महिला दिन

Amit Kulkarni
error: Content is protected !!