Tarun Bharat

मंगळवारी दोघांचा बळी

Advertisements

एक निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह

प्रतिनिधी / मडगाव

मडगावच्या कोविड हॉस्पिटलात सोमवारी एकूण चार जणांचा बळी गेला होता. त्यातील एक बळी हा रात्री 10.45 दरम्यान होता. एका 55 वर्षीय महिलेचा बळी गेला तरी रात्री उशिरापर्यंत त्या सदंर्भातील घोषणा करण्यात आली नव्हती. मात्र, मंगळवारी सकाळी या संदर्भात घोषणा करताना ही महिला निगेटिव्ह होती, असे सांगण्यात आले.   तर पहाटे चिखली येथील आगुस्तीन फर्नांडिस (47) याचा बळी गेला. त्यामुळे कोविड बळीची संख्या 18 वर पोचली असून वास्कोतील बारावा बळी ठरला आहे.

चिनुबाई या महिलेला मंगळवारी रात्री मृत्यू आला तरी डॉक्टरांनी अधिकृत घोषणा केली नसल्याने काहीसे गोंधळाचे वातावरण होते. या महिलेची हृदयप्रक्रिया कमकुवत होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली. ही महिला सुरवातीला कोरोना पॉझिटिव्ह होती. नंतर दहा दिवसांनी तिची स्वॅब चाचणी घेतली असता ती निगेटिव्ह आली होती. मात्र, कोरोनाच्या संसर्गामुळे तिची प्रकृती प्रचंड खालावली होती. तिला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. तिथेच तिने अखरेचा श्वास घेतला.

प्रोटोकॉलनुसार एखादी आजारी व्यक्ती पॉझिटिव्ह झालेली असेल आणि उपचारानंतर पुन्हा निगेटिव्ह झाली असेल तर तिला चौदा दिवस हॉस्पिटलात ठेवणे आवश्यक असते. त्याप्रमाणे चिनुबाईला हॉस्पिटलात ठेवण्यात आले होते. तिला दुसऱया हॉस्पिटलात स्थलांतरित करण्यासारखी परिस्थिती नव्हती अशी माहिती देण्यात आली. ही महिला नेमकी कुठली याची माहिती उलपब्ध झाली नसली तरी ती वास्कोतील असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला अप्रत्यक्षरित्या कोविडचाच बळी आहे. मात्र, त्या सदंर्भातील अधिकृत घोषणा आरोग्यखात्याने करणे आवश्यक आहे.

चिखली-वास्को येथील आगुस्तीन फर्नांडिस (47) यांचा पहाटे बळी गेला. तो असिम्प्टोमॅटिक होता. त्याला शिरोडा कोरोना केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे तो सिम्प्टोमॅटिक बनल्याने त्याला गुरूवार दि. 9 रोजी कोविड हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. पहिल्या दिवसापासून त्याची प्रकृती खालावलेली होती. अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरू होते. सात दिवसानंतर काल त्याचा बळी गेला. वास्कोतील हा बारावा बळी ठरला.

वास्कोत कोरोनाचा बारावा बळी

कोणताही आजार नसतानाही मृत्यू आल्याने आश्चर्य

प्रतिनिधी / वास्को

वास्को चिखली येथील कोरोना रुग्णाला अखेर मृत्यू आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मयत व्यक्तीचे नाव आगुस्तीन फर्नांडिस (47) असे असून गेल्या महिन्याभरापासून तो शिरोडा आणि मडगावात डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली होता. त्याला अन्य कोणताच आजार नव्हता, तरीही त्याला मृत्यू आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये चिखलीतील व्यक्तीला मृत्यू आल्याची माहिती मंगळवारी वास्कोत पसरली. दोन निष्काळजीपणाची प्रकरणे वगळता आतापर्यंत वास्कोत कोरोनामुळे मृत्यू आलेल्या व्यक्तींना काहींना काही आजार असल्याचे दिसून आले होते. त्यामुळेच त्यांचा कोरोनाने बळी घेतल्याचे बोलले जात आहे. परंतु वास्को चिखली येथील मंगळवारी मृत्यू आलेल्या व्यक्तीला कोणताही आजार नव्हता. शिवाय तो गेला महिनाभर कोरोना निवारण्यासाठी झटणाऱया डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली होता. कोरोना पॉझिटिव्ह मिळाल्याने त्याला प्रथम शिरोडय़ातील कोविड कॅअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे काही दिवस ठेवल्यानंतर त्याला मडगावच्या कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या महिनाभरातील त्याच्यावरील उपचार निष्फळ ठरून अखेर त्याला मृत्यू आला. त्याचे वय जास्त नव्हते तसेच त्याला अन्य कोणता आजारही नव्हता. तरीही त्याला मृत्यू आल्याने वास्को परीसरातील लोकांना धक्काच बसलेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार चिखलीतील ही व्यक्ती चिखलीतच गाडे वजा दुकान चालवत होती. त्याचा भाऊ वीज खात्याचा कर्मचारी असून प्रथम त्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर मयत आगुस्तीनला कोरोना झाला व नंतर कुटुंबातील सर्वच सदस्यांना कोरोना झाला. त्यामुळे या कुटुंबातील सर्व कोरोना बाधीतांना कोविड कॅअर सेंटर तसेच कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आतापर्यंत सर्वजण कोरोनापासून मुक्त होऊन घरी परतले आहेत. परंतु आगुस्तीन याची प्रकृती खालावत गेली. आगुस्तीन हा वास्कोतील बारावा कोरोना बळी ठरला आहे.

Related Stories

कायसूव येथील श्री स्वामी अच्युतानंद महाराज यांची आज पूण्यतिथी

Amit Kulkarni

मुरगावच्या नगराध्यक्षपदी लियो रॉड्रिक्स यांची बिनविरोध निवड

Amit Kulkarni

दत्तवाडी म्हापसा येथे आगीत 5 घरे जळून खाक

Omkar B

शरद पवार यांची विजय सरदेसाई यांनी घेतली सदिच्छा भेट

Amit Kulkarni

रावण कॉलनी आगीच्या भडक्मयात काजू बागायत जळून खाक

Amit Kulkarni

मिराबाग येथे बेकायदा चिरेखाणीत ट्रक पाण्याखाली गेला

Amit Kulkarni
error: Content is protected !!