Tarun Bharat

मंगळवारी 6,777 रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले : दिवसभरात 6,259 नवे रुग्ण

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दीड लाखाच्या उंबरठय़ावर येऊन पोहोचला आहे. मंगळवारी 6,259 नव्या रुग्णांची भर पडली. मागील आठवडय़ापासून राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी उच्चांकी  6,777 जण कोरोनामुक्त झाले आहेत. 

आरोग्य आणि कुटुंबकल्याण खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात मागील 24 तासांमध्ये 110 रुग्णांचा बळी गेला आहे. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा 2,704 वर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 1,45,830 बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 69,272 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उपचारातील रुग्णसंख्या 73,746 इतकी आहे. त्यापैकी 634 जण आयसीयुमध्ये उपचार घेत आहेत.

बेंगळूर जिल्हय़ातील रुग्णसंख्या वाढत असतानाच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही सुधारले आहे. मंगळवारी दिवसभरात या जिल्हय़ात सर्वाधिक 4,274 जण संसर्गमुक्त होऊन घरी परतले. तर बळ्ळारी जिल्हय़ात 438, रामनगर 259, धारवाड 293, म्हैसूर 164, उडुपी 161, गुलबर्गा 152, रायचूर 116 तसेच इतर जिल्हय़ातून एकूण 6,777 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात रुग्ण डिस्चार्ज होण्याचे हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण आहे.

Related Stories

देशाला नेत्याची नव्हे नायकाची गरज

Patil_p

इंधन दरवाढीचा भडका; मध्य प्रदेशात पेट्रोल 112 रुपये लिटर

Tousif Mujawar

महिंद्राचा जियोबीपीसोबत करार

Patil_p

दिलासादायक! दिल्लीत मागील 24 तासात 648 नवे कोविड रुग्ण

Tousif Mujawar

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांनी पेटवली ट्रेन; एका युट्युबरसह ४०० जणांविरोधात FIR दाखल

Archana Banage

आयुर्वेदिक-होमिओपॅथिक डॉक्टरांना मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा

Patil_p