Tarun Bharat

मंगळवेढयातील नगराध्यक्षांच्या विरोधात सुरु असलेले आंदोलन चौथ्या दिवशी स्थगित

Advertisements

तरुण भारत संवाद
मंगळवेढा/वार्ताहर

मंगळवेढयातील नगरपरिषद कार्यालयासमोर नगराध्यक्षांच्या मनमानी कारभाराविरोधात मागील चार दिवसापासून नगरपालिकेतील कर्मचारी बेमुदत धरणे आंदोलनास बसले होते. दरम्यान,नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी कर्मचार्‍यांना लेखी पत्राव्दारे नागरिकांची गैरसोय व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होवू नये यासाठी आंदोलकांना आंदोलनापासून परावृत्त केल्याने तूर्त कर्मचार्‍यांचे आंदोलन स्थगित करण्यात आले. यामुळे आता कार्यालयीन कामकाजाला सुरळीतपणा येणार आहे.

नगरपरिषदेमधील कर्मचार्‍यांनी दि.26 जानेवारीपासून नगरपालिकेच्या गेटजवळ नगराध्यक्षा यांच्या मनमानी विरोधात धरणे आंदोलन सुरु केले होते. शासन स्तरावर नगराध्यक्षांवर कारवाई सुरु असले बाबत जिल्हा प्रशासनाने संघटनेला कळविण्यात आले आहे. मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांच्या मान देवून तसेच नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून संघटनेने काम बंदो आंदोलन स्थगित करीत असल्याचे प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रसिध्द पत्रकात म्हटले आहे. यापुढे नगराध्यक्षा यांच्या पतीचा कामात हस्तक्षेप झाल्यास व शासन स्तरावर सुरु असलेली कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा कामगार संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार यांनी दिला आहे.

Related Stories

शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी; शरद पवार मोठे हे मी मानत नाही

Abhijeet Shinde

सोलापूर : ग्रामीणमध्ये १७९ कोरोनाबाधित रुग्णांची भर

Abhijeet Shinde

पुण्यात आज महिला मुक्ती परिषद

prashant_c

पंढरपुरात सावत्र आईचा खून

Abhijeet Shinde

सोलापुरात आज 21 कोरोनाबाधित रुग्णांची भर, कोरोनाने घेतला 26 वा बळी

Abhijeet Shinde

शेतीच लॉकडाऊन होण्याची वेळ

Abhijeet Shinde
error: Content is protected !!