Tarun Bharat

मंगळूर महाविद्यालयात रॅगिंग करणाऱ्या केरळच्या ११ विद्यार्थ्यांना अटक

मंगळूर/प्रतिनिधी

मंगळूर नर्सिंग महाविद्यालयातील पाच फ्रेशर्स विद्यार्थ्यांवर रॅगिंग करण्याच्या आरोपावरून गुरुवारी ११ नर्सिंग आणि फिजिओथेरपी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ते मूळचे केरळमधील आहेत.

मंगळूर नर्सिंग महाविद्यालयात पाच नवीन विद्यार्थ्यांवर सिनिअर ११ विद्यार्थ्यांनी रॅगिंग केली आहे. या घटनेची दखल घेत पोलिसांनी विद्यार्थ्यांवर कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांचूर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (केआयएमएस) मधील ११ बीएससी फिजिओथेरपी आणि बीएससी नर्सिंग विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे अटक केली होती.मंगळूर शहर पोलीस

आयुक्त एन. शशी कुमार यांनी अटक केलेले सर्व विद्यार्थी हे केरळचे रहिवासी आहेत आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला करुन त्यांच्या राज्यातून पाच फ्रेशर्सना दादागिरी केली. या व्यतिरिक्त अटक केलेल्या विद्यार्थ्यांवर असा आरोप केला की विद्यार्थ्यांनी केस कापून त्यांची मिशा काढायला सांगितले.

पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे मोहम्मद शामोस, असिन बाबू, दोघेही कोझिकोड येथील, अब्दुल अनानास, जयफिन रोयचन्ना दोघेही कासारगोड येथील अक्षय के.एस., रॉबिन बिजू, अल्व्हिन जो, जेरोम सिरिल सर्व कोट्टायम येथील. मोहम्मद सूरज, पठाणमथिताचे झुबिन मेरूफ, अब्दुल बासित दोघेही मल्लापुरम जिल्ह्यातील केरळ येथील आहेत.

Related Stories

आमदार भालचंद्र जारकिहोळी यांना जलसंपदा मंत्री करा : मंत्री श्रीमंत पाटील

Archana Banage

कर्नाटक सरकारने तज्ज्ञांकडून ‘ब्लॅक फंगस’ विषयी मागितला तपशील

Archana Banage

संजनाच्या आरोग्याबाबत सीबीआयचे अधिकारी तुरुंग अधिकाऱ्यांशी संवाद साधणार

Archana Banage

कर्नाटक: विधानसभा विसर्जित करा आणि निवडणूक लढवा : सिद्धरामय्या

Archana Banage

मंत्रिमंडळात राज्यातून चौघांना संधी

Amit Kulkarni

कर्नाटक पाच टप्प्यात अनलॉक होणार : महसूलमंत्री

Archana Banage