Tarun Bharat

मंगळूर विमानतळ ‘अदानी समुहा’कडे

बेंगळूर

: केंद्र सरकारच्या विमानतळाचे खासगीकरण करण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाले आहे. त्यानुसार मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समुहाकडे हस्तांतर करण्यात आले आहे. मंगळूर विमानतळाचे संचालक व्ही. व्ही. राव यांनी अलीकडेच मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी समुहाकडे सोपविले आहेत. विमानोड्डाण वगळता सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आता अदानी ग्रुपच्या संस्थेकडे राहणार आहे.

अदानी मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सीईओ अशुतोष चंद्र आणि अदानी विमानतळाचे सीईओ बेहाड झंडी यांच्याकडे विमानतळ हस्तांतराला संबंधित पत्र देण्यात आले आहे. मंगळूर विमानतळाचे नाव ‘अदानी मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ असे ठेवण्यात आले आहे. 50 वर्षांपर्यंत विमानतळाचे व्यवस्थापन करण्याचा अदानी संस्थेबरोबर करार करण्यात आला आहे. एका वर्षाच्या कालावधीसाठी विमानतळ प्राधिकरण आणि अदानी संस्था एकत्रित काम करणार आहे. त्यानंतर संपूर्ण व्यवस्थापन अदानी संस्थेकडे जाणार आहे.

‘अदानी मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ नामकरण

मंगळूर विमानतळ अदानी समुहाकडे हस्तांतर केल्यानंतर पहिल्या उड्डाणातील सर्व प्रवाशांना मिठाईचे वाटप करण्यात आले. विमानतळाला जोडणाऱया रस्त्यांना अदानी एअरपोर्ट असे फलक लावण्यात आले आहेत. मंगळूर विमानतळाचे नाव ‘अदानी मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे बदलण्यात आले आहे.

Related Stories

पूरस्थिती : केंद्राकडे अधिक मदतनिधी मागणार

Patil_p

कर्नाटक: रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्यांना गृहमंत्र्यांच्या इशारा

Archana Banage

राज्यात लॉकडाऊन की अनलॉक; मुख्यमंत्र्यांची आज महत्वाची बैठक

Archana Banage

रांगणा किल्ल्याचे संवर्धन निकृष्ट दर्जाचे – खा. संभाजीराजे

Archana Banage

रेमडेसिवीर चोरी केल्याप्रकरणी नर्सला अटक

Archana Banage

ऑनलाईन जुगार बंदीबाबत निर्णय घ्या!

Amit Kulkarni