Tarun Bharat

मंगळ ग्रहासारख्या ठिकाणी वास्तव्याची संधी

पृथ्वीवर ‘बोर’ झालेल्यांसाठी नासाकडून पर्याय

‘द मार्शियन’ या हॉलिवूडपटात अभिनेता मॅट डेमन यांनी मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर अनेक  दिवस रहावे लागलेल्या व्यक्तीची भूमिका साकारली होते. आता नासानेही पृथ्वीवर राहणाऱया लोकांसाठी काहीशी अशीच ऑफर दिली आहे. नासा मंगळ ग्रहावर अंतराळवीरांना पाठविण्यापूर्वी मंगळ ग्रहावरील वास्तविक आव्हानांसाठी तयार करू इच्छिते.

अमेरिकेच्या ह्युस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरच्या एका इमारतीत 3डी-प्रिंटरद्वारे मंगळ ग्रहासारखे ठिकाण तयार करण्यात आले आहे. 1,700 चौरस फुटांमध्ये फैलावलेल्या या जागेचे नाव ‘मार्स डय़ून अल्फा’ आहे. नासाने या विशेष जागेसाठी लोकांकडून अर्ज मागविले आहेत. या लोकांना तेथे एक वर्षापर्यंत राहता येणार आहे.

या स्वयंसेवकांना मंगळ ग्रहावरील आव्हानांची ओळख करून देणे हा नासाचा उद्देश आहे. या स्वयंसेवकांना या ठिकाणी स्पेसवॉक करावा लागणार आहे. त्यांचा घराशी असणारा संपर्क अत्यंत कमी केला जाणार आहे. भोजन आणि साधनसामग्रीचे प्रमाण मर्यादित असेल. याचबरोबर मंगळ ग्रहावर दिसून येणाऱया पर्यावरणाशी संबंधित अनेक गोष्टी सामील असतील.

पण नासाच्या या जॉबसाठी अर्ज करण्याकरता अमेरिकेचा नागरिक असणे गरजेचे आहे. याचबरोबर या कार्यक्रमासाठी अर्ज करणाऱया व्यक्तीने विज्ञान, इंजिनियरिंग किंवा गणित विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे. वैमानिक असण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे.

या पदाकरता 30 ते 55 वर्षांपर्यंत वय असणारे लोक अर्ज करू शकतात. तसेच त्यांचे आरोग्य चांगले असावे. मोशन सिकनेसचा त्रास असू नये आणि याचबरोबर फुल बॉडी मेडिकल सर्टिफिकेट उपलब्ध करणेही आवश्यक आहे.

Related Stories

8 कोटी लोक उपासमारीच्या वाटेवर

Patil_p

विमानवाहतूक सुधारायला 2024 उजाडणार

Patil_p

भारतीय व्यावसायिकाचे काबूलमध्ये अपहरण

Patil_p

अमेरिका खेळात परतली आहे !

Omkar B

जो बायडेन, कमला हॅरिस टाईम ‘पर्सन ऑफ द ईयर’

Patil_p

लंडनमध्ये उभारणार पुरीच्या जगन्नाथासारखे मंदिर

Patil_p