Tarun Bharat

मंगसुळी खंडोबाचे दर्शनही भाविकांसाठी बंद

डेल्टा प्लस रोखण्यासाठी निर्णय

प्रतिनिधी /बेळगाव

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हय़ातील प्रमुख मंदिरांमधील देवदर्शन बंद ठेवण्याचा आदेश यापूर्वीच देण्यात आला आहे. आता मंगसुळी (ता. कागवाड) येथील खंडोबा मंदिरही दर्शनासाठी बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे.

महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंगसुळी मल्लय्या-खंडोबा देवस्थानाला महाराष्ट्रातून मोठय़ा प्रमाणात भाविक येतात. सध्या बेळगावच्या सीमेला लागून असलेल्या महाराष्ट्रातील जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

कागवाडच्या तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱयांकडे प्रस्ताव पाठविला होता. भाविकांच्या आरोग्याचे हित जपण्यासाठी देवदर्शन बंद ठेवण्याची शिफारस त्यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱयांनी सोमवारी आदेश बजावला आहे. दर्शन बंद ठेवण्याबरोबर परिसरातील दुकाने बंद ठेवण्याची सूचनाही आदेशात करण्यात आली आहे. भाविकांसाठी दर्शन बंद असले तरी रोजची पूजा-अर्चा करण्यास मुभा देण्यात आली आहे. यापूर्वी सौंदत्ती-यल्लम्मादेवी, जोगुळभावी-सत्यम्मा देवी, चिंचली-मायक्का देवी, बडकुंद्री-होळेम्मा देवी आदी प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन बंद करण्याचा आदेश बजावण्यात आला होता. आता मंगसुळी येथील खंडोबाचे दर्शनही पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

Related Stories

चव्हाटा, शिव खानापूर, शिवसेना, रॉयल किंग्ज संघ विजयी

Amit Kulkarni

कुद्रेमनीत आज साहित्यिकांची मांदियाळी

Patil_p

दीपक नार्वेकर बीपीसी 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा 6 जानेवारीपासून

Patil_p

आरपीडी पीयू कॉलेज ऑफ आर्ट्स ऍन्ड कॉमर्समध्ये नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत

Amit Kulkarni

यमनापूर येथील होलसेल दूध व्यापाऱयाला 17 हजाराला लुटले

Patil_p

लॉकडाऊनमध्येही रेल्वे दुपदरीकरणाचे काम सुसाट

Amit Kulkarni