Tarun Bharat

मंत्री पावसकरांकडे खंडणी मागणारे गजाआड

प्रतिनिधी/ पणजी

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पावसकर यांना धमकी देऊन तीन कोटी रुपयांची खंडणी मागून ती वसूल करण्यासाठी आलेल्या तिघांना पणजी पोलिसांनी शिताफिने अटक केली आहे. त्यांच्या विरोधात भादंसंच्या 384 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिली आहे. तिघेही मुंबई येथील आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयितांमध्ये प्रदीप मलिक, आर. पाटील व अमोल स्वामी (तिघेही मुंबईतील) यांचा समावेश आहे. याबाबत मंत्री दीपक पावसकर यांनी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती.

तीन कोटी रुपयांची मागितली खंडणी

गेल्या काही दिवसांपासून अज्ञात फोननंबरवरुन मंत्री पावसकर यांना फोन येत होते. फोन करणारी व्यक्ती तीन कोटी रुपयांची मागणी करीत होती. हे पैसे न दिल्यास पावसकर यांची बदनामी करणार असल्याच्या धमक्या देत होती. असे मंत्री पावसकर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

……………..बॉक्स…………………..

पावसकरांच्या बंगल्यावर तिघांच्या आवळल्या मुसक्या

रविवारी 20 रोजी असाच अज्ञान फोन नंबरवरून पुन्हा फोन आला होता. आपण तीन व्यक्तींना गोव्यात पाठवित असून त्यांच्याकडे पैसे द्यावे असे त्या व्याक्तीने पावसकर यांना सांगितले होते. सोमवारी संध्याकाळी तिन्ही व्यक्ती येणार असल्याची माहिती पावसकर यांनी पोलिसांना दिली होती. संशयित तिन्ही व्यक्ती पावसकर यांच्या शासकीय बंगल्यावर आले असता पोलिसांनी त्यांना शिताफीने अटक केली आहे.

…………………………………………………………………………………………………………

खंडणीमागण्याबाबत अनेक प्रश्न निर्माण

सार्वजनिक बांधकाममंत्री पावसकर यांच्याकडेच अज्ञात व्यक्ती खंडणी का मागत होते. तसेच पावसकर यांना कोणत्या कारणावरून ती अज्ञात व्यक्ती बदनाम करण्याची धमकी देत होते असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ज्या व्यक्तीने खंडणी घेण्यासाठी तीन व्यक्तीना पाठविले होते ती व्यक्ती कोण व मंत्री पावसकर यांना ती व्यक्ती कशी ओळखते असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

तिघाही संशयितांना आला होत एक फोन

अटक पेलेल्या व्यक्तींची पोलिसांनी कसून चौकशी केली असता अटक केलेल्या संशयितांना एका व्यक्तीचा फोन आला होता, असे उघड झाले. त्यात त्यांनी म्हटले होते की अमुक ठिकाणी चला, अमुक माणूस जे काही देईल ते घेऊन या. त्याबद्दल योग्य मोबदला तुम्हाला मिळणार, असे सांगितले होते.

अज्ञाताकडून आलेल्या आदेशाचा फोन परदेशातील

त्या व्यक्तीच्या आदेशानुसार आम्ही गोव्यात आलो व मंत्री पावसकर यांच्या बंगल्यावर गेलो असे संशयितांनी पणजी पोलिसांसमोर उघड केले आहे. संशयितांना ज्या नंबरवरून फोन आला होता तो नंबरही पोलिसांनी मिळविला आहे. पोलिसांनी त्या नंबरची तपासणी केली असता तो फोन नंबर परदेशातील असल्याचे आढळून आले आहे.

…………………….बॉक्स……………..

खंडणीचे गोवा, मुंबई ते परदेश कनेक्शन कोणते?

मंत्र्यांकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न या प्रकरणावरून आता अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. खंडणी मागणारी व्यक्ती मंत्री पावसकर यांना कशी ओळखते? ती भारतातील आहे की परदेशातील? ज्या कारणांवरून मंत्री पावसकर यांना बदनाम करण्याची धमकी दिली जात होती ते कारण कोणते? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. खंडणी वसूल करण्यासाठी आलेले तिघेही मुंबईतील आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गोवा, मुंबई ते परदेशी कनेक्शन काय याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Stories

पर्यटकांना सतावणाऱयांविरुद्ध कारवाई करा

Amit Kulkarni

म्हादई, तूरडाळ-साखर, बेरोजगारीप्रकरणी काँग्रेसकडून राज्यपालांना निवेदन सादर

Amit Kulkarni

चोर्ला घाट परिसरात एसटी-जीप अपघातामुळे वाहतूक ठप्प

Patil_p

गोवा स्वच्छ ठेवण्यासाठी पुढे येऊया

Amit Kulkarni

वास्को मांगोरहिल मार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाची उंची वाढणार

Amit Kulkarni

गोव्यातील चार वाघांचा विषप्रयोगामुळेच मृत्यू

Patil_p