Tarun Bharat

मंत्री महोदयांचे कोल्हापुरात जंगी स्वागत

कोल्हापूर /प्रतिनिधी

महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोल्हापुरातील तीन आमदारांची मंत्री पदी वर्णी लागलीय . कॅबिनेट मंत्री पदी हसन मुश्रीफ , तर राज्यमंत्री पदी सतेज पाटील, राजेंद्र यड्रावकर यांनी मंत्री पदाची शपथ घेतली . या शपथविधीनंतर या तिन्ही मंत्र्यांचे आज कोल्हापूरला स्वागत झाले , यावेळी ताराराणी चौकात तिन्ही मंत्र्यांचे जंगी स्वागत करण्यात आले . कोल्हापूरच्या महापौर सूरमंजिरी लाटकर यांनी स्वागत केले.

या स्वागतानंतर ताराराणी चौकातुन मंत्री महोदयांची दसरा चौका पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली . या मिरवणुकीत खासदार धैर्यशील माने ,संजय मंडलिक ,आमदार चंद्रकांत जाधव, ऋतुराज पाटील , उपमहापौर संजय मोहिते ,जि .प .अध्यक्ष बजरंग पाटील ,माजी आमदार के.पी. पाटील , संजय डी .पाटील , शिवसेनेचे संजय पवार ,विजय देवणे यांच्यासह सर्व नगरसेवक ,नगरसेविका ,पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Stories

महागाई विरोधात आ. पी. एन. पाटील यांची पदयात्रा

Archana Banage

कोल्हापूर विमानतळावर सुरक्षा सप्ताह

Archana Banage

शिक्षक आमदार जयंत आसगावकर कोरोना पॉझिटीव्ह

Archana Banage

सांगली : स्वच्छता लोकचळवळ होत नाही, तोपर्यंत शाश्वत विकास नाही : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

Archana Banage

कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी 25 फेब्रुवारीपासून नियमित

prashant_c

चित्रपट महामंडळाचा धनादेश चोरून भरला उपाध्यक्षांच्या खात्यावर

Archana Banage