Tarun Bharat

मंत्री रामविलास पासवान यांच्यावर दिल्लीत शस्त्रक्रिया

Advertisements

एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल

नवी दिल्ली

 मागील एक महिन्यापासून रुग्णालयात दाखल केंद्रीय खाद्य तसेच सार्वजनिक पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्यावर दिल्लीतील एका रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. अचानक काही कारणांमुळे शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. आवश्यकता पडल्यास पुढील काही आठवडय़ांमध्ये दुसरी शस्त्रक्रिया करावी लागू शकते, अशी माहिती त्यांचे पुत्र आणि लोजप अध्यक्ष चिराग पासवान यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी चिराग यांना फोन करून केंद्रीय मंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पासवान यांच्यावर हृदयाशी संबंधित दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. यापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपसोबतच्या आघाडीसंबंधी निर्णय घेण्यासाठी लोजपच्या संसदीय कार्यकारिणीची बैठक होणार होती. परंतु पासवान यांची प्रकृती बिघडल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. रामविलास यांची प्रकृती बिघडल्याने विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि अन्य मुद्दय़ांवर चर्चा करण्यासाठी बिहार दौऱयाला विलंब होऊ शकतो, असे चिराग यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते.

Related Stories

आयआयएफएल होम फायनान्सला परवानगी

Patil_p

दिल्लीत कोरोना रुग्णांनी ओलांडला 6.25 लाखांचा टप्पा

Rohan_P

भारतात मागील 24 तासात 28,701 नवे कोरोना रुग्ण, 500 मृत्यू

datta jadhav

इस्लामिक स्टेटच्या महिला दहशतवाद्याला परत आणा

Patil_p

राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तोंडावर अयोध्येत कोरोनाची धडक!

Rohan_P

बिहार : दिवसभरात 408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Rohan_P
error: Content is protected !!