Tarun Bharat

मंत्री लोबोंचा कॉग्रेस प्रवेश तसेच युतीसंदर्भात चर्चा नाही

Advertisements

प्रतिनिधी /म्हापसा

मागच्या दहा वर्षात कळंगुटातून हरवलेले पक्षाचे गतवैभव आपणां? सर्वांना अर्थातच कॉग्रेसजनांना पुन्हा? एकदां प्राप्त करण्यासाठी सर्वानी एकजुटीने झटण्याचे आवाहन पक्षाचे वरिष्ट नेते पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी संध्याकाळी आयोजित  तारांकीत हॉटेलच्या बंद सभाग्रुहात बोलतांना केले. अंदाजे तीनशेच्या आसपास उपस्थित असलेल्या पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांना चिदंबरम  मार्गदर्शन करत होते.  यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, उत्तर गोवा कॉग्रेसचे अध्यक्ष विजय भिके, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड,  कळंगुटचे माजी आमदार तथा कॉग्रेस नेते आग्नेलो फर्नाडीस, माजी सरपंच जोजफ सिक्वेरा, नुकतेच कॉग्रेसवासी झालेले एन्थ?नी मिनेझीस आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, कळंगुट मतदार संघाचे विद्यमान आमदार तथा राज्याचे मंत्री मायकल लोबो यांच्या कॉग्रेस प्रवेशावरून उठलेल्या चर्चाच्या पाश्वभुमीवर शुक्रवारची सभा आयोजित करण्यात आल्याने मतदारसंघातील सर्वाचेच त्यांकडे लक्ष लागून राहिले होते. तथापि, मंत्री लोबो यांच्या कॉग्रेस प्रवेशावरून आजच्या बैठकीत  किंचीतही चर्चा झाली नसल्याचे कळंगुट गट समितीचे अध्यक्ष बेनेडिक्ट डिसौझा यांनी नंतर पत्रकारांशी बोलतांना सांगितले. मंत्री लोबोंचा कॉग्रेस प्रवेश या हेतुपुरस्सर पसरविण्यात आलेल्या  नुसत्या अफवां असल्याचेही  वरिष्ठाकडून सांगण्यात आल्याचे डिसौझा यांनी  यावेळी  स्पष्ट केले.

कळंगुट मतदार संघातून येत्या विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार आग्नेलो फर्नाडीस, माजी सरपंच जोजफ सिक्वेरा तसेच एन्थ?नी मिनेझीस यांना सोमवारपासून घरोन्घर प्रचाराची सुरुवात करण्याचा वरिष्ठाकडून सल्ला देण्यात आला आहे.  तथापि,पक्षाच्या उमेदवारीसाठी ज्या कुणाची  वरिष्ठाकडून निवड केली जाईल त्याच्या मागे आपण सर्वजण  खंबीरपणे उभे राहाणार असल्याची ग्वाही यावेळी केली.

Related Stories

पोरस्कडे येथे मारहाणीची घटना

Amit Kulkarni

गटार कोसळल्यामुळेच रस्ता बंद करावा लागला

Amit Kulkarni

जिल्हा पंचायतींना भरघोस वाढीव निधी

Omkar B

केपे बाजार परिसरात लॉकडाऊनला दुसऱया दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

Patil_p

वीज वाहिन्याशी संपर्क आल्याने सांगेत एकाचा बळी

Omkar B

डान्स बारना मान्यता देण्यात मुख्यमंत्र्यांचाच हात

Amit Kulkarni
error: Content is protected !!