Tarun Bharat

मंत्री शंभूराज देसाई यांच्या ताफ्यातील पोलिसांना कोरोनाची बाधा

वाहतूकशाखेचेपोलीसनिरीक्षकविठ्ठलशेलारयांनीघेतलेल्याकाळजीमुळेवाहतूकशाखेचेकर्मचारीसुखरूप

प्रतिनिधी/ सातारा

 राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनांच्या ताफ्यात सगळ्यात पुढे असणाया काळ्या रंगांच्या पायलट गाडी स्कार्पिओतील एक पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस जवान बाधित झाले असून ते रुग्णालयात उपचार घेत असल्याची खात्रीपूर्वक माहिती आहे.दरम्यान शहर वाहतूक शाखेतील चार जवान कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत.शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांच्यामुळे वाहतूक शाखेत जवान कोरोना पासून सुखरूप आहेत.दरम्यान, सातारा शहरात दोन तर तालुक्यात एक अशा तीन जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.शहरात कोरोनाला ब्रेक लागेना झाला आहे.

सातारा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना झाल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईला नेण्यात आले आहे.असे असतानाच राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वाहनांच्या ताफ्यात पायलट म्हणून सर्वात पुढे एक काळ्या रंगांची स्कार्पिओ जीप असते.त्या जीप मध्ये एक पोलीस अधिकारी, एक सहाय्यक फौजदार दोन वाहतूक शाखेचे जवान कार्यरत असतात.अशा चौघांना कोरोनाची बाधा झाल्याने ते सध्या उपचार घेत आहेत,अशी खात्रीपूर्वक माहिती आहे.दरम्यान, सातारा वाहतूक शाखेत पायलटमधील दोन आणि आणखी दोन कर्मचारी बाधित झाले आहेत.वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार यांनी वाहतूक शाखेच्या जवानांची पुरती काळजी घेतली आहे.सकाळी डय़ुटीवर येण्यापूर्वी ताप, सर्दी, खोकला आहे का?,असे हजेरी मास्टरला सांगून तपासणी करून डय़ुटीवर हजर करून घेतले जात आहे त्यामुळे वाहतुक शाखेच्या जवानांची काळजी घेतली जात असल्याची चर्चा आहे.

शहरातल्या दोन जणांचा तर तालुक्यातील एकाचा मृत्यू

कोरोना झाल्याने क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे गोडोली सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, नेले ता. सातारा येथील 75 वर्षीय महिला व सातारा येथील गुरुवार पेठ सातारा येथील 76 वर्षीय पुरुष बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हे निकट सहवासात आल्याने त्यांना बाधा झाली होती.तर सातारा तालुक्यात 49 बाधित आढळून आले ते पुढीलप्रमाणे  दौलतनगर येथील 1, कामाठीपुरा येथील 1,नेले – किडगाव 1,  सातारा 2, भवानी पेठ 1, शाहूनगर  2, खेड 1, पोलीसलाईन 1, दरे ब्रु 1, तामजाईनगर  1, वाहतूक पोलीस 1, वडोली 1, विलासपूर 1, शनिवार पेठ 1, वडगाव 1, गुरुवार पेठ 1, अतित 15, वाढे 5,विकासनगर 1, वळसे 1, नांदगाव 2,  मल्हारनगर 1,  केसरकर पेठ 1, सोमवार पेठ 1, शिवथर 1, गोडोली 1, देशमुखकॉलनी 1, राजशपुरापेठ सातारा 1,

Related Stories

फसवणूक करणाऱ्या मुकादमांवर कारवाईसाठी सांगलीत ऊस वाहतूकदारांची ट्रॅक्टर रॅली

Archana Banage

राज्य सरकार हे घोटाळ्यांचे सरकार – माजी खासदार धनंजय महाडिक

Abhijeet Khandekar

सातारच्या ‘हिरकणी’ने नोंदवला अनोखा विक्रम

Patil_p

कोल्हापूर : इस्पुर्लीत दारूसाठा जप्त

Archana Banage

देशातील वातावरण बदलत आहे..राहूल आवाज उठवणारा नेता- संजय राऊत

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात 3 हजार पेक्षाअधिक नवीन कोरोना रुग्ण

Tousif Mujawar