Tarun Bharat

मंथनतर्फे उद्या 33 वे महिला साहित्य संमेलन

बेळगाव / प्रतिनिधी

मंथन कल्चरल ऍण्ड सोशल वेल्फेअर सोसायटीतर्फे 33 वे महिला साहित्य संमेलन रविवार दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत वरेरकर नाटय़ संघ येथे आयोजित करण्यात आले आहे. अध्यक्षा म्हणून माधुरी शानभाग उपस्थित राहणार आहेत. संमेलनात पहिल्या सत्रात अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱया सत्रात सामाजिक भान या विषयावरील परिसंवादात किशोर काकडे व अनिरूद्ध ठुसे सहभागी होणार आहेत. तिसऱया सत्रात कवयित्रींचे संमेलन होणार असून त्यानंतर नाटय़ाविष्कार व बक्षीस विजेत्यांचे कथाकथन होईल. संमेलन सर्वांना खुले असून रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष संपदा जोशी यांनी केले आहे.

माधुरी शानभाग यांचा परिचय

माधुरी शानभाग या बेळगावच्याच असून 35 वर्षे त्यांनी जीएसएस महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून व 5 वर्षे प्राचार्या म्हणून काम केले आहे. कर्नाटक विद्यापीठ व राणी चन्नम्मा विद्यापीठांच्या अनेक समितींवर सदस्य व चेअरपर्सन म्हणून काम केले आहे. अनेक शैक्षणिक परिषदा, राष्ट्रीय व राज्यस्तरीय चर्चासत्रे यात तज्ञ म्हणून भाग घेतला आहे. त्यांची एकूण 43 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सामाजिक आणि साहित्यिक विषयावर देश-विदेशात अनेक व्याख्याने व कथाकथन केले आहे. महाराष्ट्र राज्याच्या दोन पुरस्कारांसह 25 अनेक सामाजिक व साहित्यिक संस्थांचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

 

Related Stories

राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत राव अकादमीचे घवघवीत यश

Amit Kulkarni

पायाभरणीपूर्वीच रुग्णालय उभारण्याची घाई

tarunbharat

दुसऱया टप्प्यातील मतदानासाठी जिल्हाधिकाऱयांकडून पाहणी

Patil_p

बांधकाम परवाना रद्द का करू नये?

Amit Kulkarni

लक्ष्मीनगर (हिं.) परिसर भंगीबोळातील अतिक्रमण हटविण्याची मागणी

Amit Kulkarni

बेदरकार वृत्ती :अपघातांची पुनरावृत्ती

Amit Kulkarni
error: Content is protected !!