Tarun Bharat

मंदिरासाठी मुस्लीम कुटुंबाने दान केली अडीच कोटींची जमीन

ऑनलाईन टीम / तरुण भारत

प्रसार माध्यमे हिंदु – मुस्लिम यांच्याबद्दल चर्चा करताना बहुतांशी वेळा या दोन्ही धर्मातील लोकांची संघर्षाबद्दलचेच विषय अनावश्यकरित्या चघळले जात असतात. मात्र दोन्ही धर्मांना मानवतेच्या बंधनात एकत्र आणणारी बाब समोर आली आहे. जगातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरासाठी आपली जमीन दान करत एका मुस्लीम कुटुंबाने जातीय सलोख्याचं उदाहरण दिलं आहे. धर्माच्या भिंती ओलांडत बिहारमधील कुटुंबाने तब्बल अडीच कोटींची जमीन विराट रामायण मंदिरासाठी दिली आहे.

हे मंदिर जगातील सर्वात मोठं हिंदू मंदिर असल्याचा दावा केला जात आहे. बिहार राज्यातील पूर्व चंपारण जिल्ह्यात हे मंदिर उभारलं जात आहे. या मंदिराच्या विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष आचार्य किशोर कुणाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “इश्तियाक अहमद खान यांनी ही जमीन दान केली असून ते उद्योजक आहेत. यावेळी आचार्य म्हणाले कि, खान यांनी दिलेलं हे दान दोन समाजात असणारा सलोखा आणि बंधुभावाचे उत्तम उदाहरण असल्याचं म्हटलं आहे. मुस्लिमांच्या मदतीशिवाय हे स्वप्न पूर्ण होणं अशक्य होतं असंही ते म्हणाले.

महावीर मंदिराने आतापर्यंत मंदिर उभारणीसाठी १२५ एकर जमीन मिळवली आहे. आता अजून २५ एकर जमीन विश्वस्त मंडळ मिळवणार आहे. हे मंदिर विराट रामायण मंदिर २१५ फूट उंच असलेल्या कंबोडियातील १२ व्या शतकातील जगप्रसिद्ध Angkor Wat संकुलापेक्षा उंच असेल. असे ही ते यावेळी म्हणाले आहेत.

Related Stories

चाचणीनंतरच संशयितावर अंत्यसंस्कार

Patil_p

रब्बीमध्ये सुरळीत वीजपुरवठा करा : डॉ. नितीन राऊत

Tousif Mujawar

साहित्यकारांनी समाजात शाश्वत मूल्ये रुजवावीत : कथाकथनकार आप्पासाहेब खोत

Archana Banage

गृहमंत्री अनिल देशमुख सोमवारी सातारा दौऱ्यावर

Archana Banage

आकाशात दोन विमानांची जोरदार धडक, पायलटसह 6 ठार

datta jadhav

कोंढावळे व वासोळे येथील कातकरी समाजातील 50 कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Patil_p