तरुण भारत

मक्यामुळे प्रोटीनचा पुरवठा

शरीराला प्रथिनांची अत्याधिक आवश्यकता असते. त्यांच्या अभावी शरीर दुर्बळ होण्याचा धोका असतो. प्रथिनांसाठी मांस, अंडी, दूध किंवा इतर फुड सप्लिमेंटस्वर अवलंबून रहावे लागते. मात्र पूर्णतः शाकाहारी व्यक्ती मांस आणि अंडी खात नाही. त्यामुळे त्यांच्या शरीरात प्रथिनांची कमतरता निर्माण होऊ शकते. तथापि बनारस हिंदू पिठाच्या संशोधकांनी मांस किंवा अंडी न खाणाऱया लोकांची सोय करणारे संशोधन केले आहे. त्यांनी मका या पिकाची एक अशी प्रजाती विकसित केली की जी शाकाहारी लोकांच्या प्रथिनांची आवश्यकता भागवू शकेल. मक्याची ही प्रजाती केवळ प्रथिनेच नव्हे तर कॅल्शियमची आवश्यकता भागवण्यासाठी सक्षम आहेत. हा मका सर्वसमान्यांप्रमाणेच शाकाहारी खेळाडूंसाठीही आधार बनू शकतो. खेळाडूंना प्रथिने आणि कॅल्शियम यांची आवश्यकता सर्वसामान्यांपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात असते. ती भागविण्यासाठी त्यांना मांस खाता येत नसल्याने महागडय़ा फुड सप्लिमेंटस् उपयोगात आणाव्या लागतात. तथापि हा मका किफायतशील खर्चात हे काम करू शकतो असू संशोधक पी. के सिंग यांनी स्पष्ट केले आहे. या मक्याला लायसिंग असे म्हटले जात आहे. शाकाहारी पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रथिने सोयाबीनमध्ये 43.2 टक्के इतकी असतात. तथापि या मक्याच्या प्रजातीत त्यांचे प्रमाण यापेक्षाही अधिक आहे. त्यामुळे तो कोटय़वधी लोकांसाठी पुर्णाहार ठरू शकतो. आता या प्रजातीचे पेटंट मिळविण्यासाठी संशोधकांची धडपड सुरू आहे.

Related Stories

लक्षण दिसत नसल्यामुळे

Amit Kulkarni

शिगेलोसिस म्हणजे काय ?

Omkar B

‘COVAXIN’ च्या मानवी चाचणीस सुरुवात

datta jadhav

वैद्यकशास्त्राचा चमत्कार – 10 वर्षांनी 78 वर्षीयाला मिळाली दृष्टी

Patil_p

दुपारचे जेवण आणी आरोग्य

Amit Kulkarni

कोरोना काळात उपयुक्त गॅजेट

Omkar B
error: Content is protected !!