Tarun Bharat

मगो पक्षाच्या याचिकेवर आजपासून सुनावणी

बाबू आजगांवकर, दीपक पाऊस्कर अपात्रता प्रकरण

प्रतिनिधी / पणजी

मगो पक्षातून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेले मंत्री बाबू आजगांवकर व दीपक पाऊस्कर यांनी पात्र ठरवले तरी त्यांच्या पात्रतेचा कस आज शुक्रवार दि. 24 सप्टेंबर पासून गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयापुढे लागणार आहे. आमदार सुदिन ढवळीकर यांनी सादर केलेली अपात्रता आव्हान याचिका न्या. मनीष पटेल व न्या. एम. एस. जवळकर यांच्या न्यायपीठासमोर सुनावणीस येणार आहे.

याचिकादार ढवळीकर यांच्यावतीने ऍड. धवल जवेरी बाजू मांडणार आहेत. तर प्रतिवादी दोन्ही मंत्र्यांच्यावतीने ऍड. परिक्षीत सावंत बाजू मांडणार आहेत. या याचिकेवर ही पहिलीच सुनावणी असून सभापती आणि दोन्ही मंत्री यांच्याकडून काय प्रत्युत्तर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मगोच्या तीन आमदारांपैकी दोन आमदार म्हणजे 2/3 गट फुटून भाजपमध्ये सामील झाला. हा मोठा गट म्हणजे मगो पक्षाचा प्रमुख गट व हा मोठा गट भाजपमध्ये विलीन झाल्याने मगो पक्षच भाजपमध्ये विलीन करण्यात आल्याचा दोन्ही मंत्र्यांनी केलेला दावा सभापती राजेश पाटणेकर यांनी उचलून धरला होता व आमदारांचा 2/3 विधिमंडळ गट फुटला म्हणजे संपूर्ण पक्ष फुटला असा त्याचा अर्थ होतो का? यावर सुनावणीवेळी चर्चा होणार आहे.

मगो पक्ष अजून अस्तित्वात असून विधानसभेत या पक्षाला एक स्थान आहे. हा आमदार मगोचा आमदार म्हणून त्याच सभापतींनी मान्यता दिली आहे व दुसऱया बाजूने तेच सभापती मगो पक्ष पूर्णपणे भाजपमध्ये विलीन झाल्याचा दावा मान्य करतात. त्यामुळे सभापतींचा निवाडा अयोग्य असून तो फेटाळण्यात यावा आणि या दोघाही फुटीर आमदारांना अपात्र ठरवावे, अशी याचना या याचिकेत करण्यात आली आहे.

Related Stories

कोरोना रुग्णसंख्येत वाढ

Amit Kulkarni

फरारी मुख्य आरोपी व्हॅली डिकॉश्ताच्या मागावर पोलीस

Amit Kulkarni

वाळपई नवोदय विद्यालयाच्या परिसरात गव्याचा वावर

Amit Kulkarni

राज्यातील पारा उतरला

Amit Kulkarni

कळंगुटमधील डान्सबार बंदीसाठी अधिवेशनात बिल आणावे

Patil_p

डिचोली तालुक्मयात दोन तलाठी पॉझिटिव्ह

Patil_p