Tarun Bharat

मगो पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार सोपटेंनी आणले विघ्न

पेडणे / प्रतिनिधी

भाजप सरकारने आणि मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी सर्व ताकद वापरुन आपल्या मगो पक्षात प्रवेश करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अडथळा निर्माण केला. हे पोर्तुगीज राजवटीतसुध्दा न घडलेले वाईट काम अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन सरकारी यंत्रणेला हाताशी धरुन केल्याचा आरोप मांदे मतदारसंघाचे मगो पक्षात प्रवेश केलेले युवा नेते जीत आरोलकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

 पेडणे येथे मगो पक्षाच्या कार्यालयात मंगळवारी 17 रोजी आयोजित केलेल्या पञकार परिषदेत आरोलकर बोलत होते. सरकार व आमदारांच्या या कृतीचा आपण जाहीर निषेध करत आहे. आमदार सोपटे यांच्या  या कृतीचे उत्तर मांदे मतदारसंघातील जनता 2022 मध्ये होणाऱया विधानसभेच्या निवडणुकीत देईल, असेही ते म्हणाले.

आठ दिवसांपूर्वी मागितली होती परवानगी

आपल्या मगो प्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आठ दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती. मात्र आम्हाला झुलत ठेवून सभेच्या दिवशी दुपारी साडेतीन वाजता परवानगी नाकारल्याचे आयोजकांना कळविले. यावरुन माझ्या मगो पक्षात प्रवेश करण्याच्या कार्यक्रमाला विघ्ने आाणण्यासाठी हा सर्व खटाटोप होता, हे स्पष्ट दिसून आले. माझ्या मगो प्रवेशावेळी शेकडो कार्यकर्ते मगो पक्षात प्रवेश करणार याचा धसका आमदार दयानंद सोपटे यांनी घेतला आणि त्यांच्या पायाखालची वाळू घसरु लागली.

भाऊसाहेबांचे फोटो असलेले फलक काढले

सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेले गोव्याचे भाग्यविधाते भाऊसाहेब बांदोडकर यांचे फोटो असलेले फलक काढण्याचे कृत्य जनता कधीही विसणार नसल्याचे आरोलकर म्हणाले.

आपल्या मगो प्रवेशासाठी 200 पोलीस कार्यक्रम स्थळी ठेवण्यात आले. हे पोलीस माझ्या स्वागतासाठी असल्याचे पाहून खूप आनंद झाला, असेही ते म्हणाले.

Related Stories

वादी-प्रतिवाद्यांना सादर करावे लागणार प्रतिज्ञापत्र

Amit Kulkarni

गोमंतकीयांचा पक्ष बनण्याचे तृणमुलचे ध्येय

Amit Kulkarni

संसर्गजन्य रोगाच्या निर्मूलनासाठी जागरूकता महत्त्वाची-पिल्लई

Amit Kulkarni

मगरींचा लोकवस्तीपर्यंत संचार वाढला

Omkar B

गोमंत विद्या निकेतनमध्ये 12 रोजी राष्ट्रीय ग्रंथपाल दिन

Amit Kulkarni

राज्यात नारळ विकास मंडळ स्थापणार

Omkar B