Tarun Bharat

”…मग हवं तर मन की बात पण करा”; राहुल गांधींची पीएम मोदींवर टीका

Advertisements


नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम


काँग्रेस नेते राहुल गांधी देशातील कोरोना स्थितीवरून वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदी सरकारवर निशाणा साधत असतात. आज देखील राहुल गांधी यांनी लसीकरण मोहीम आणि ‘मन की बात’ याची सांगड घालत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ट्वीटच्या माध्यमातून हल्ला चढवला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी यांनी आज, रविवारी ‘ मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यासंबंधीच राहुल गांधी यांनी दोन ओळींचे पण मार्मिक असे ट्वीट करत मोदी सरकारवर टीकेचे झोड उठवली आहे. ”फक्त प्रत्येक देशवासियांपर्यंत लस पोहचवा, मग हवं तर मन की बात पण सांगा!”असं राहुल गांधी यांनी आज ट्विटद्वारे म्हटलं आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ११ वाजता ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना लसींचे दोन्ही डोस घेणं गरजेचं असल्याचे सांगितलं. त्याचसोबत त्यांनी टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा देखील दिल्या. तसेच त्यांनी साताऱ्यातील प्रवीण जाधव या खेळाडूचे ऑलिंपिक निवडीबद्दल कौतुक केलं. टोकियोला जाणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा स्वतःचा संघर्ष आहे. या खेळाडूंना भारताचा गौरव वाढवायचा आहे. म्हणूनच मी देशवासियांना सांगू इच्छितो, की या खेळाडूंवर आपण दबाव न आणता त्यांना खुल्या मनाने पाठिंबा द्या, असे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. यासोबतच त्यांनी मिल्का सिंग यांचं स्मरण केलं.

Related Stories

राष्ट्रीय महामार्गावर धारधार शस्त्रासह एकास अटक

Sumit Tambekar

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

पृथ्वीवरील स्वर्ग अर्थात श्रीनगरमधील ट्युलिप गार्डन होणार पर्यटकांसाठी खुले

Sumit Tambekar

भारताचा चीनला आर्थिक दणका

Omkar B

देशात कोरोनाचे 39,070 नवे रुग्ण

datta jadhav

‘द किंग ऑफ कॉमेडी’ची एक्झिट

Patil_p
error: Content is protected !!