Tarun Bharat

मच्छिमार होडय़ांचे मोटर चोरल्याप्रकरणी पेडणे पोलिसांची संदेश चोडणकर याला अटक

प्रतिनिधी /पेडणे

पेडणे पोलिसांनी किनारी भागातील मच्छिमार होडय़ांच्या मोटर चोरी प्रकरणी चोराव तिसवाडी येथील संदेश चोडणकर यांना 13 रोजी अटक केली व  त्याच्याकडून   3 लाख 8  हजार रुपये   किंमतीची  मोटार इंजिन जप्त केली.

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहिती नुसार 10 रोजी केरी धाकटेबाग येथील रोहन पेडणेकर यांनी आपल्या होडीचा मोटार चोरीला गेल्याची तक्रार दिली होती . त्यानुसार पोलीस टीम तयार केली , व काही ठिकाणीचे  सीसीटीव्ही चित्रीकरण घेतले , त्यात संशयीची ओळख पटली .पोलिसांनी तपास करत संशयीताल   शिताफीने पकडले .त्याच्या घरातून  दुसऱया एका मोटारचे इंजिन जप्त  केले .

दरम्यान मागच्या दीड वर्षापासून मोरजी ,  मांदे , ’  हरमल व केरी या ठिकाणचे मच्छीमार बांधव व्यावसायिकांचे किमान 10 ते बारा मोटार चोरीला गेले आहे . त्याविषयी तक्रारीही दिल्या मात्र आजपर्यत त्या मोटार यंत्रांचा  पत्ता लागला नाही . त्यामुळे व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त करत होते .

पेडणे पोलिसांनी संदेश चोडणकर या चोरटय़ाला अटक केली आहे . इतर 10 बारा चोरीला गेलेल्या मोटारांचा तपास लावावा अशी मागणी होत आहे . पकडलेल्या चोरी प्रकरणी पोलीस निरीक्षक जिवबा दळवी हे पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई व अधीक्षक सोबीत सक्सेना  यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करत आहे.

Related Stories

गोव्यात काँग्रेस स्थिर सरकार स्थापन करेल – पी चिदंबरम

Abhijeet Khandekar

स्वयंपूर्ण गोवासाठी सहकार क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे

Amit Kulkarni

मुस्लीमवाडा डिचोली येथील क्रॉस गटरची भर पावसात दुरूस्ती.

Omkar B

उत्तम समतोलामुळेच ‘लोकमान्य’वरील लोकांचा विश्वास वाढला

Amit Kulkarni

मुंबईचा सामना आज हैदराबादशी

Amit Kulkarni

चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाका, स्वदेशी वापरा

Omkar B