Tarun Bharat

मच्छीमारांचे बेमुदत साखळी उपोषण अखेर स्थगित

Advertisements

दापोली / प्रतिनिधी

दापोली तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाला बसलेल्या मच्छिमारांनी मत्स्यमंत्री अस्लम शेख यांच्या लेखी आश्वासनानंतर बाराव्या दिवशी आपले उपोषण स्थगित केले आहे. अरबी समुद्रात सुरू असणाऱ्या एलईडी, फास्टर, पर्ससीन बोटिंगच्या आधारे अवैध मासेमारीच्या विरोधात दापोली, मंडणगड, गुहागर मच्छीमार कृती समितीचे कार्यकर्ते गेले बारा दिवस साखळी उपोषणाला बसले होते. याबाबत मत्स्य मंत्री अस्लम शेख यांनी एक महिन्याच्या मुदतीत कायदा करण्याचे व कडक कारवाई करण्याचे लेखी आश्वासन रत्नागिरी जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते यांना दिले. यानुसार कोळी बांधवांनी आपले उपोषण स्थगित केले.

यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते यांनी मत्स्य मंत्री अस्लम शेख यांच्या आश्वासनाची प्रत मच्छीमार नेते पी. एन. चोगले यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार वैशाली पाटील, कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे, उपाध्यक्ष प्रकाश रघुवीर, सचिव गोपीचंद चोगले, यांच्यासह अनेक कोळी बांधव उपस्थित होते. तसेच काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक जाधव, माजी आमदार डॉ. चंद्रकांत मोकल, तालुकाध्यक्ष भाऊ मोहिते, जिल्हा सचिव संतोष शिर्के, उपनगराध्यक्ष प्रशांत पुसाळकर, शहराध्यक्ष सिराज रखांगे, माजी नगराध्यक्ष अविनाश केळस्कर, अ‍ॅड. योगेश दांडेकर, सेना नेते अरुण उर्फ अण्णा कदम, यांच्यासह काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मच्छिमार नेते पी. एन. चोगले यांनी उपोषण स्थगित करत असल्याचे जाहीर केले.

Related Stories

अनुसूचित जाती, जमाती, भटक्या विमुक्तच्या 49 वस्त्या रस्त्याच्या प्रतीक्षेत

NIKHIL_N

प. पू. मौनी महाराज अनंतात विलीन

Ganeshprasad Gogate

कोवीड -1 9 चाचण्यासाठी व्यक्तीची तीन गटात विभागणी निश्चित

Patil_p

कोरोना महामारीत माणुसकीही हरवत चाललीय!

Patil_p

विकासकामे जनतेपर्यंत पोहचवा!

NIKHIL_N

जिल्हय़ाला कोरोना लसीचे 19,200 डोस प्राप्त

Patil_p
error: Content is protected !!