Tarun Bharat

मच्छे कुस्ती मैदान मारले गणेश फडकेने

वार्ताहर /किणये

हलगी, ढोल ताशाच्या गजरात व पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमी नागरिकांच्या उपस्थितीत कडोली गावच्या गणेश फडकेने ओमकारला सवारी डावावर चितपट करून मच्छे कुस्ती मैदान जिंकले.

गावातील ब्रह्मलिंग यात्रेनिमित्त मंदिराच्या बाजूला बुधवारी सायंकाळी ग्रामीण भागातील कुस्तीपटूंसाठी कुस्ती आखाड्याचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती आखाड्यात तीसहून अधिक  तालुक्यातील लहान व तरुण पैलवानांच्या कुस्त्या झाल्या.

आखाड्यातील प्रथम क्रमांकची कुस्ती  ओमकार अनगोळकर व गणेश फडके यांच्यात लावण्यात आली. ही कुस्ती देवस्थान कमिटीचे  अध्यक्ष चांगापा हावळ, उपाध्यक्ष सुरेश लाड, सेक्रेटरी संजय सुळगेकर, नागेश गुंडोळकर आदींच्या हस्ते लावण्यात आली.

ओमकार व गणेश या दोन्ही पैलवानांनी एकमेकांच्या ताकतीचा अंदाज घेत कुस्तीला प्रारंभ केला ही कुस्ती बरीच रंगतदार ठरली.

प्रारंभी आखाड्याचे पूजन धोंडीराम तरनाळे यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच हनुमान फोटो पूजन दिलीप जोरापूर यांनी केले.

या आखाड्यात  प्रज्वल पाटील याने आपल्या प्रतिस्पर्धी पैलवान सोबत चटकदार कुस्ती सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

तसेच रोहन अनगोळकर, सिद्धांत खामकर, भरमा पाटील, लक्ष्मण हुंदरे, भरतेश, विठ्ठल, चिन्नू पाटील, वैष्णव धामणेकर, भूमिक लाड, प्रज्वल परसन्नवर, सुहास खादरवाडी, प्रवीण, सतीश फडके, सलील रनकुंडे समीर रणकुंडे, शुभम चौगुले, आर्यन पाटील, सचिन लाड या कुस्तीपटूंनी आपल्या कुस्त्या सादर केल्या. आखाड्यातील पंच म्हणून रामचंद्र नावगेकर, बाबू मुल्ला, भरमाना धामणेकर यांनी कामकाज पाहिले.

Related Stories

कोल्हापुरातील धरणे आंदोलन यशस्वी करणार

Patil_p

बुडाच्या समुदाय भवन उभारणीचे काम सुरू

Amit Kulkarni

खानापूर दिवाणी न्यायालयाच्या सुसज्ज इमारतीचे उद्या उद्घाटन

Omkar B

जांबोटी, रामापूरपेठ, बसस्टँड राजवाडा येथे सॅनिटायझरची फवारणी

Patil_p

मतदानाचा टक्का घटला

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटीतर्फे ग्राहकांसाठी 10 टक्के व्याजदर मिळविण्याची अभूतपूर्व संधी

Omkar B