Tarun Bharat

मजगावातील शर्यतीत कोलकारांची म्हैस प्रथम

प्रतिनिधी /बेळगाव

अष्टविनायक दूध संकलन केंद्राच्यावतीने मजगाव गावमर्यादित म्हैस पळविण्याची जंगी शर्यत आयोजित करण्यात आली होती. या शर्यतीत प्रथम क्रमांक भरमा कोलकार यांच्या म्हशीने पटकावला. द्वितीय क्रमांक सुलतान मुजावर, तृतीय क्रमांक गुंडू गौरण्णा, चौथा क्रमांक कल्लाप्पा हित्तलमनी, पाचवा क्रमांक मोईन मुजावर, सहावा क्रमांक नमन पाटील यांच्या म्हशींनी पटकाविला. त्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते दीपक सातगौडा, बापू भडांगे उपस्थित होते. यावेळी भडांगे म्हणाले, पहिल्यांदाच अशी शर्यत आयोजित करण्यात आली आहे. कारण शेतकरी तसेच गवळी बांधवांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱयांना मार्गदर्शन करणे, पशुपालनाबाबत माहिती देण्यासाठी भविष्यात विविध उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्रीकांत कालिबाग, श्रीशैल कालिबाग, विक्रम हंडे, प्रसाद अनगोळकर, राहुल मजुकर, गुंडू गौरण्णा तसेच गावातील शेतकरी व गवळी बांधव उपस्थित होते.

Related Stories

अवकाळीने बसस्थानकात चिखलाचे साम्राज्य

Amit Kulkarni

अनगोळ स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य

Omkar B

संकेश्वरात टास्कफोर्स कमिटीची स्थापना

Patil_p

मनपा निवडणुकीकरिता दोन निरीक्षकांची नियुक्ती

Amit Kulkarni

कोविड-19 व डोळय़ांचे विकार

Patil_p

तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल स्पॅन 320 टनाचा

Amit Kulkarni