Tarun Bharat

मजरे कासारवाडा येथील युवकाचा शॉक लागून जागीच मृत्यू

वार्ताहर / तुरंबे

दसऱ्या निमित्त राहत्या घराची स्वच्छता करत असताना विद्युत मोटरचा शॉक लागून राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा येथील श्रीराज अशोक वारके या युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे मजरे कासारवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर या अपघातामुळे वारके कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे दसरा सन या कुटुंबियांच्या आठवणीत कायमचा राहिला आहे.

मजरे कासारवाडा येथील माजी सरपंच अशोक वारके यांचे कुटुंब रविवारी दसरा सणासाठी घराची स्वच्छता करत होते. त्यांचा मोठा मुलगा श्रीराज वारके हा पाण्याची मोटार सुरु करून घराच्या भिंतीवर पाणी मारत होता. अचानक पाण्यातून त्याला जोराचा विजेचा शॉक लागला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. संपूर्ण कुटुंबांसमोर हा प्रकार घडला मात्र कोणालाही समजण्या पुर्वी श्रीराजचा मृत्यू झाला.

श्रीराज हा अत्यंत मन मिळाऊ आणि होतकरू असल्याने त्याचा मित्र परिवारही मोठा होता. त्याच्या या अपघाताची माहिती समजताच मित्र परिवाराने मोठी गर्दी केली होती. तर आईने मला माझ बाळ दाखवा अस म्हणत फोडलेला हंबरडा ह्दय पिळवटून टाकणारा होता. दोनच वर्षापूर्वीच श्रीराजचा विवाह झाला होता. त्याला एक वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. त्याच्यावर सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली आहे.

Related Stories

कोल्हापूर जिल्ह्यात 25 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू

Archana Banage

कोल्हापूर : दिवसरात्र होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे नागरिकांचा जीव टांगणीला..

Archana Banage

सीपीआरमध्ये बंद असलेल्या इतर रुग्णसेवा तात्काळ सुरू करा

Archana Banage

कोल्हापुरात आज कोरोनाचे ४० बळी, १९१९ नवे रुग्ण

Archana Banage

नऊ दिवसांत अडीच कोटींची उलाढाल ठप्प; मटण दरवाढीचा तिढा कायम

Archana Banage

breaking- धबधब्यातून वाहत जाऊन दरीत पडलेल्या युवकाचा मृत्यू,भुईबावडा घाटातील घटना

Rahul Gadkar
error: Content is protected !!