Tarun Bharat

मटक्यावर वक्रदृष्टी कधी पडणार ?

गौरी आवळे/ सातारा

अल्पवधीत पैसे कसे कमवायचा याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले असते. यासाठी पडद्याआडून केलेली कामे ही तेव्हाच यशस्वी होतात, जेव्हा त्याला पाठबळ हे प्रत्यक्ष पोलीसांकडून मिळते. असेच पाठबळ सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या मटका व्यवसायिकांना मिळत आहे. छुप्या पद्धतीने सूरू असलेला मटका व्यवसाय दिवसेंदिवस तेजीत सुरू आहे. परंतु करवाई हप्त्याच्या जोरावर थंडावल्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. संपूर्ण देशासह सातारा जिह्यातही कोरोनाचा शिरकाव झाला. अनेकांचे रोजगार गेले तर व्यवसाय ठप्प झाले. यामुळे दिवसेंदिवस वाढत चाललेली आर्थिक चणचण ही जगण्यावर प्रश्नचिन्ह उभे करत होती. यामुळे अनेकांनी बेकायदेशीररित्या पैसे कमवण्यास सुरूवात केली. यामुळे सातारा शहरासह शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगारासह मटका चांगलाच फोफावला. टपऱया बंद असल्या तरी प्रत्यक्षात बंद टपरीतच मटक्यांचा खेळ तेजीत सुरू असल्याचे दिसून आले. तर लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास बंदी असल्याने अनेकांनी घरातच मटका खेळ सुरू ठेवला होता. यामुळे अवैधरित्या सुरू असणाऱया या मटका व्यवसायिकांवर कुणाचा वचक आहे का ? असा प्रश्न जनसामान्यातून निर्माण झाला. या प्रश्नाकडे पोलीसांनी किती लक्ष दिले आणि किती कारवाई केल्या याबाबत जणू संभ्रम अवस्था पहायला मिळत आहे. शाहूपुरी पोलीसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार सन 2020 या वर्षात जुगार व मटका अशा मिळून 56 कारवाया तर 2021 मध्ये 63 कारवाया करण्यात आलेल्या आहेत. या कारवाई फक्त कागदोपत्री राहत असल्याने प्रत्यक्ष यांची भीती वाटत नसल्याने अनेक जण पोलीसांच्या नजरेसमोर असे बेकायदेशीर मटक्याचे खेळ सुरू ठेवत आहेत.

Related Stories

सातारा जिल्ह्यात आणखीन ३६ जण पॉझिटिव्ह तर १९१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

Archana Banage

संसदेचे पावसाळी अधिवेशन ‘या’ तारखेपासून होणार सुरु

Archana Banage

अकरावी प्रवेशाबाबत पुन्हा अचानक तपासणी

Patil_p

Nasik; नाशिकच्या शास्रार्थ सभेत महंतांची हमरीतुमरी

Abhijeet Khandekar

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची कास पठारला भेट

Patil_p

रुग्ण वाढल्यास मुंबईतही लॉकडाऊन : पालकमंत्र्यांनी दिले संकेत

Tousif Mujawar