Tarun Bharat

मटण दम बिर्याणी

Advertisements

साहित्यः  अर्धा किलो बासमती तांदूळ,  अर्धा चमचा जिरं, 1 चमचा तेल, मीठ, मॅरीनेटः अर्धा किलो मटण, पाऊण वाटी दही, 3 हिरव्या मिरच्या चिरून, मीठ, 1 चमचा लाल तिखट, पाणी, इतरः 5 चमचे तेल, 2 कांदे चिरून, 1 चमचा आलं-लसूण पेस्ट, 4 हिरव्या मिरच्या चिरून, पाव वाटी कोथिंबीर चिरून, 4 चमचे पुदिना चिरून, चिमुटभर केशरकाडय़ा, चिमुटभर खाण्याचा रंग, मीठ, खडा मसालाः 1 चमचा जिरं, 4 काळीमिरी, 3 लवंग, 3 वेलची, 2 इंच दालचिनी, 2 तमालपत्र, 1 चक्रीफूल.

कृतीः कुकरमध्ये मटण, मीठ, हिरवी मिरची, दही आणि वाटीभर पाणी ओतून 3 ते 4 शिट्टय़ा घ्याव्यात. चमचाभर कोमट दुधात केशरकाडय़ा व खाण्याचा रंग मिक्स करावा. तांदूळ अर्धा तास भिजत ठेवून निथळावेत. पाण्याला उकळी काढून त्यात जिरं, मीठ आणि चमचाभर तेल टाकावे. नंतर तांदूळ टाकून 7 ते 8 मिनिटे अर्धाकच्चा शिजवावा. जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करून त्यात खडा मसाला, कांदा आणि हिरवी मिरची टाकून परतवावे. नंतर आलं-लसूण पेस्ट टाकावी. आता त्यात फक्त  शिजलेले मटण आणि लाल तिखट मिक्स करून मिश्रण शिजवावे. नंतर मटण ग्रेव्ही घालावी. त्यावर थोडी पुदिना व कोथिंबीर टाकावी. आता शिजलेला तांदूळ, पुदिना व कोथिंबीर टाकावी. वरून केशर व खाण्याचा रंग टाकून झाकण ठेवून मध्यम आचेवर 15 मिनिटे तर 10 मिनिटे मंद आचेवर ठेवावे. गार झाले की सलादसोबत खाण्यास द्या.

Related Stories

घरच्या मसाल्यांनी बनवा चविष्ट वांगी भात

Kalyani Amanagi

पनीर कोफ्ता

Omkar B

पनीर-काजू

tarunbharat

जिरा कुकीज

Omkar B

बदाम खीर

Omkar B

हेल्दी एंड टेस्टी टाकोज

Amit Kulkarni
error: Content is protected !!