Tarun Bharat

मठाधिपतीपदाच्या वादात पिसाळ महाराजांची हत्या

Advertisements

प्रतिनिधी / तरुण भारत संवाद पंढरपूर

येथील श्री मारूतीबुवा कराडकर मठाच्या मठाधिपती पदाचा तीन वर्षापासूनचा वाद होता. या वादावरून माजी मठाधिपतीने विद्यमान मठाधिपती जयवंत पिसाळ (वय 32) यांची हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर माजी मठाधिपती बाजीराव जगताप कराडकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारच्या एकादशीसाठी बाजीराव जगताप कराडकर हे पंढरपूरात आले होते. यानंतर मंगळवारी मारूतीबुवा कराडकर मठामध्ये विद्यमान मठाधिपती जयवंत पिसाळ (रा. लवंगमाची, ता. वाळवा जि. सांगली) आणि बाजीराव कराडकर (रा. कोडोली, ता. कराड, जि. सातारा) यांच्यामध्ये वाद सुरू झाले. वादाचे रूपांतर भांडणामध्ये झाले. यावेळी बाजीराव हे जयवंत बुवावर हल्ला करीत असल्याचे काही लोकांनी पाहिले. तात्काळ मठातील वारकऱयांनी पोलिसांना कळवले. यानंतर पोलिसांच्या सुचनेवरून पिसाळ आणि कराडकर यांचे भांडण सुरू असलेल्या खोलीला बाहेरून कडी घालण्यात आली. याच दरम्यान दोघांच्या भांडणातून जयवंत पिसाळ यांची हत्या करण्यात आली. पोलीस हे तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी संबधित खोलीची कडी उघडून आरोपीस ताब्यात घेतले.

या घटनेनंतर संपूर्ण वारकरी सांप्रदायामध्ये खळबळ माजली. यावेळी पंढरपूरातील अनेक महाराज मंडळींनी मठाकडे धाव घेतली. याशिवाय पंढरपूरातील इतरही नागरिकांनी यावेळी कराडकर मठाबाहेर गर्दी केली होती. साधारण सायंकाळी सहाच्या सुमारास मयत जयवंत पिसाळ यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. तर रात्री उशीराने श्री मारूतीबुवा मठ कराडचे सर्व विश्वस्त पंढरपूरात दाखल झाले होते. 

बाजीराव कराडकर यांच्यावर गुन्हा दाखल

बाजीराव कराडकर हा माजी मठाधिपती आहे. तर जयवंत महाराज पिसाळ हे विद्यमान मठाधिपती आहेत. ‘मठाधिपती तू का मी…’ अशा वादामध्ये मंगळवारी दुपारी दोघांत भांडणे झाली. आणि यातूनच बाजीरावाने जयवंत महाराज पिसाळ यांची हत्या केली. याप्रकरणी बाजीराव कराडकरवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक

व्यक्तीद्वेशी घटना…

 पिसाळ महाराजांच्या खुनाची घटना समजली. हा वाद मठाधिपतीपदावरून आहे. ही संपूर्ण घटना व्यक्तीव्देषी असल्याचे दिसून आले आहे. कारण वारकरी सांप्रदाय हा कधीही हिंसा शिकवत नाही.

                           ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर

                           अध्यक्ष, वारकरी फडकरी दिंडी संघटना 

असा आहे मठाधिपतींचा वाद…

  • 3 फेब्रुवारी 2017 रोजी मठाधिपती मारूतीमामा कराडकर यांचे निधन
  • फेब्रुवारी महिन्यातच बाजीराव जगताप कराडकर हे विश्वस्त व वारकऱयांच्या संमतीने मठाधिपती झाले.
  • फेब्रुवारी 2017 ते मे 2018 दरम्यान श्री मारूतीबुवा मठ कराडचे विश्वस्त आणि मठाधिपती बाजीराव कराडकर यांच्यात वादंग
  • जून 2018 मधे बाजीराव कराडकर यांची मठाधिपती पदांवरून हकालपट्टी..
  • 12 जून 2018 रोजी सातारा धर्मादाय उपायुक्तांना विश्वस्तांनी दिलेल्या पत्रानुसार जयवंत पिसाळ यांची मठाधिपती म्हणून नियुक्ती
  • जून 2018 ते जानेवारी 2020 पर्यत बाजीराव कराडकर आणि श्री मारूतीबुवा मठ कराडच्या विश्वस्तांमध्ये वादंग आणि न्यायालयीन लढाई
  • दरम्यान बाजीराव कराडकर यांने ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत माने यांच्या डोक्यात वीणा फुटेपर्यंत मारले होते. याप्रकरणी बाजीरावला कारावास देखिल भोगावा लागला होता.
  • 7 जानेवारी 2020 रोजी बाजीराव कराडकर आणि विद्यमान मठाधिपती जयवंत पिसाळ यांच्यातील वाद आणि पिसाळ यांची हत्या
  • 7 जानेवारी 2020 रोजीच दुपारी अडीच वाजता बाजीराव कराडकरला पोलिसांनी केली अटक.

Related Stories

सोलापुरात मराठा आरक्षण आंदोलन पेटले

Abhijeet Shinde

अमेरिकेच्या रॉकेट हल्ल्यात इराणचा मेजर जनरल सुलेमानी ठार

prashant_c

संचारबंदी उल्लंघन : नवीपेठेतील अठ्ठावीस व्यापाऱ्यांवर कारवाई

Abhijeet Shinde

कोल्हापुर ते मुझफ्फरपुर साप्ताहिक किसान रेल धावणार

Abhijeet Shinde

जागतिक संशोधक शास्त्रज्ञाच्या क्रमवारीत सोलापूर विद्यापीठाचे प्रा. डॉ. विकास पाटील

Abhijeet Shinde

बार्शीतील आगळगाव रोडवर सेवानिवृत्त शिक्षकाचा भरदिवसा खून

Abhijeet Shinde
error: Content is protected !!