Tarun Bharat

मडगावचे व्यापारी दामोदर आडपईकर यांचे निधन

प्रतिनिधी /मडगाव

मडगावचे ज्येष्ठ व्यापारी आणि फातोर्डा येथील श्रीकृष्ण लीला केंद्राचे संस्थापक दामोदर (दामू) आडपईकर (71) यांचे काल मंगळवारी पहाटे अल्प आजाराने दुःखद निधन झाले. काल दुपारीच त्यांच्यावर मठग्रामस्थ हिंदू सभेच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्च्यात पत्नी ः दीप्ती, पुत्र ः दीपराज व दीपकुमार तसेच इतर परिवार आहे. मडगावचे आमदार तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दामोदर आडपईकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले असून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मुळ आडपई-फोंडा येथील दामोदर आडपईकर हे व्यवसायानिमित्त गवळीवाडा-फातोर्डा येथे स्थायिक झाले होते. ते भंडारी समाजातील सक्रीय कार्यकर्ते होते. सोमवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मडगावातील एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्या ठिकाणी उपचार सुरू असतानाच मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले.

फातोर्डा येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी श्रीकृष्ण लीला केंद्राची स्थापना केली होती. या ठिकाणी विविध धार्मिक कार्यकम ते नित्य नियमाने आयोजित करायचे. गोकुळाष्टमीचा उत्सव हा मुख्य उत्सव ते साजरे करायचे. मडगावच्या न्यू मार्केटात त्यांचे दुकान असून येथूनच ते मडगावच्या सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांशी जोडले गेलेले होते. मडगाव शिगमोत्सवाच्या आयोजनात त्यांचा गेली कित्येक वर्षे सक्रीय सहभाग असायचा. मडगाव बाजारकर मंडळाचे ते सक्रीय कार्यकर्ते होते.

दरवर्षी गणेश चतुर्थीला आपल्या मुळ गावी आडपईला ते आवर्जुन उपस्थित राहून तेथील कार्यक्रमात सहभागी व्हायचे. एक चांगले हौशी कलाकार म्हणूनही त्यांची ओळख होती. काल त्यांच्या निधनाची वार्ता मिळताच मडगावातील व्यापारी, मडगाव पालिकेचे अधिकारी, शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी, त्यांचा मित्र परिवार, हितचिंतक तसेच श्रीकृष्ण लीला केंद्राशी जोडलेले भाविक मोठय़ा संख्येने अंत्यदर्शनाला उपस्थित होते.

Related Stories

पाजीफोंड भागात राजू नाईक यांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Amit Kulkarni

आरोशी ते केळशीपर्यंत दाखविलेली वाळूच्या टेकडय़ांची नोंद हटवा

Patil_p

पेडणे मतदारसंघातुन स्थानीक उमेदवार राजन कोरगावकर यांनाच उमेदवारी द्या ,धारगळमधील जेष्ठ भाजप कार्यकर्त्यांची पत्रकार परिषदेतून मागणी

Omkar B

पेडणेत कॅसिनो विरोधात एल्गार, सहा ठराव मंजूर

Patil_p

खांडेपार येथे 8 लाखांची धाडसी चोरी

Amit Kulkarni

’भूमिपुत्र’वरून मुख्यमंत्री तोंडघशी

Amit Kulkarni